जुनी पेन्शनसाठी आजचा दिवस महत्वाचा | शासनाने बोलावली २४ सचिवांची बैठक MAHARASHTRA OLD PENSION SCHEME

MAHARASHTRA OLD PENSION SCHEME : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने [Maharashtra state Gazetted Officers Association]  जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात तातडीने निर्णय झाल्यास 28 मार्च 2023 पासून राज्यातील राजपत्रित अधिकारी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती मार्फत सुरू असलेल्या बेमुदत संपात सक्रिय सहभागी होणार असल्याची नोटीस यापूर्वीच दिलेली आहे.

MAHARASHTRA OLD PENSION SCHEME
MAHARASHTRA OLD PENSION SCHEME

जुनी पेन्शनसाठी आजचा दिवस महत्वाचा | शासनाने बोलावली २४ सचिवांची बैठक  MAHARASHTRA OLD PENSION SCHEME

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मुक्त नोटीस अनुसरून माननीय मुख्य सचिव महोदय यांच्या अध्यक्षतेखाली 20 मार्च 2023 रोजी दुपारी ठीक 12:00 वाजता मुख्य सचिव यांचे समिती कक्ष येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सध्या सुरू असलेल्या बेमुदत  संपाच्या अनुषंगाने क्षेत्रीय कार्यालयाच्या एकूण उपस्थिती बाबत तसेच संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्या अनुषंगाने करावयाच्या उपायोजना किंवा कृती आराखडा इत्यादी तपशीलासह  विविध विभागाच्या अ.मु.स, सचिव, प्रधान सचिव, संचालकाना  बैठकीस उपस्थित राहण्याविषयीची विनंती महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

शासनाने आता खालील वेगवेगळ्या विभागाचे अ.मु.स, सचिव, प्रधान सचिव, संचालक यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार यांनाही बैठकीला उपस्थित राहण्याविषयी विनंती केली आहे.

अनु विभागप्रमुख विभाग
01 अ. मु. स., वित्त वित्त विभाग, मंत्रालय मुंबई
02 अ. मु. स., महसूल महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई
03 अ. मु. स., ग्रामविकास व पंचायतराज विभाग, मंत्रालय मुंबई
04 अ. मु. स., ले व को वित्त विभाग, मंत्रालय मुंबई
05 अ. मु. स., गृह विभाग, मंत्रालय मुंबई
06 अ. मु. स., सेवा सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई
07 अ. मु. स., जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई
08 अ. मु. स., सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय मुंबई
09 प्रधान सचिव नगर विकास विभाग, मंत्रालय मुंबई
10 प्रधान सचिव उद्योग उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय मुंबई
11 प्रधान सचिव कृषी व पणन विभाग, मंत्रालय मुंबई
12 प्रधान सचिव महिला व बाल विभाग, मंत्रालय मुंबई
13 प्रधान सचिव उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई
14 प्रधान सचिव मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय मुंबई
15 प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा विभाग, मंत्रालय मुंबई
16 प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई
17 प्रधान सचिव पशु संवर्धन व दुग्धविकास विभाग, मंत्रालय मुंबई
18 प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई
19 प्रधान सचिव विधी व न्याय विभाग, मंत्रालय मुंबई
20 प्रधान सचिव पाणी पुरवठा विभाग, मंत्रालय मुंबई
21 सचिव बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय मुंबई
22 सचिव, वैद्यकिय शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई
23 संचालक, लेख व कोषागारे विभाग, मंत्रालय मुंबई
24 संस्थापक, आणि सल्लागार महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी

उद्या सोमवार, उद्याचा दिवस आपल्या पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वाचा आहे.. कारण उद्या दुपारी 12 वाजता राजपत्रित अधिकाऱ्यांसोबत जुन्या पेन्शनबाबत सरकारची बैठक होणार आहे.. 22 मार्चला गुढीपाडवा आहे, सरकारची 'आनंदाची शिधा' ही मोहीम गुढीपाडव्याच्या आत लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांना कर्मचाऱ्यांची गरज आहे.

सर्व प्रशासकीय यंत्रणेला सामान्य प्रशासन विभागाने पत्र लिहून उद्याच्या उद्या माहिती मागवली आहे की या संपामुळे कोणकोणत्या गोष्टी प्रभावित झालेल्या आहेत व नागरिकांना काय ताण पडत आहे.. विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत..सरकार कोंडीत सापडलेले आहे.. 

म्हणून आज जास्तीत जास्त प्रमाणात आपण सर्व उपस्थित राहून आपल्या संपाची intensity वाढवायची आहे.. तरच सरकारला जाग येईल व जुनी पेन्शन योजना 28 मार्च च्या आत ते लागू करतील..आता आर या पार ची लढाई झालेली आहे, लढाई निर्णायक आहे, अभी नहीं तो कभी नहीं..म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतील असे वाटत आहे.

संपात सहभाग तर सेवेत खंड पडू शकतो ? काय आहे शासनाचे परिपत्रक? 

जुनी पेन्शन योजना - सरकारचा सावध पवित्रा - चर्चेतून मार्ग काढण्याची तयारी

काय फरक आहे? जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना

जुनी पेन्शन योजना - मुख्यमंत्र्यांचे संकेत काय म्हणाले सत्यजित तांबे

महत्वाच्या लिंक्स

आपल्या बालकाला पहिलीमध्ये मोफत प्रवेश हवा असेल तर ही माहिती वाचा 

    अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

    आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 

    Please do not entre any spam link in the comment box.

    टिप्पणी पोस्ट करा (0)
    थोडे नवीन जरा जुने