RTE 25% Online Admission Process - कोणती मुले पात्र? वंचित व दुर्बल घटकातील बालके म्हणजे कोणती बालके ?

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत [RTE-2009] राज्यातील खाजगी शाळांमध्ये वंचित व आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव 25 टक्के जागांसाठी ऑनलाईन प्रवेश येते. ही वंचित व दुर्बल घटकातील बालके म्हणजे कोणती बालके? या विषयी माहिती असणे आवश्यक आहे त्यामुळे यातील माहिती सर्व पालकांनी बारकाईने वाचावी. म्हणजे RTE Online Form भरताना अडचणी जाणार नाहीत किंवा पालकांचा गोंधळ उडणार नाही.

RTE 25% Online Admission Process
RTE 25% Online Admission Process

RTE 25% Online Admission Process - कोणती मुले पात्र?  वंचित व दुर्बल घटकातील बालके म्हणजे कोणती बालके ?

  • पालकांसाठी महत्वाचे - वंचित आणि दुर्बल घटकांमध्ये मोडणाऱ्या बालकांना आरटीई मध्ये मोफत प्रवेश दिला जातो. या वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालका व्यतिरिक्त विमुक्त जाती (अ) भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड)  इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, एच आय व्ही बाधित किंवा प्रभावित बालके यांचा वंचित गटामध्ये समावेश होतो.
  • दुर्बल गटामध्ये ज्या बालकांच्या पालकांचे / पालन पोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे अशा बालकांचा समावेश होतो.  त्याशिवाय एस.इ.बी.सी प्रवर्गाच्या बालकांना आर्थिक दुर्बल गटामधून प्रवेश अर्ज भरता येतो.


या शिवाय दिनांक 25 जानेवारी 2023 शासनाने काढलेल्या नवीन अधिसूचने नुसार RTE 25% Online Admission साठी खालील दोन गटातील बालकांना पात्र ठरविण्यात आले आहे.
  1. अनाथ बालके
  2. कोव्हीड प्रभावित बालके
दिनांक 25 जानेवारी 2023 शासनाने काढलेली नवीन अधिसूचना

म्हणजेच 2023-24 च्या RTE Online प्रक्रियेत अनाथ बालके आणि कोव्हीड प्रभावित बालके ही Online Form भरू शकतात.

अनाथ बालकांसाठी कागदपत्रे 

  • अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथ गृह/ अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतात.
  • बालक जर अनाथ गृह/ अनाथालयात राहत नसेल तर  जे पालक त्याचा सांभाळ करत आहेत त्यांचे हमीपत्र आवश्यक आहे.
  • पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना Single Parent पर्याय निवडला असेल तर  संबंधित बालकांचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतात.

कोव्हीड प्रभावित बालकांसाठी कागदपत्रे 

  • कोविड प्रभावित बालक म्हणजेच ज्यांचे पालक (एक किंवा दोन्ही) यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले असेल तर असे मुले ही आरटीई प्रवेशासाठी पात्र आहेत.
  •  प्रवेशावेळी कोविड प्रभावित बालक असल्याचे सबळ पुरावे जोडावे लागतील.

महत्वाचे - RTE 25% प्रवेशासाठी 2023 - 24 या वर्षासाठी बालकाचा जन्म दिनांक 01 जुलै 2016 ते दिनांक 31 डिसेंबर 2017 या दरम्यान असावा. 


ऑनलाईन अर्ज सुरु झाल्यानतर  इथून फॉर्म भरता येईल. 
खाली दिलेल्या online वर क्लिक करावे. 



वरील दोन्हीपैकी कोणत्याही एका ठिकाणी क्लिक केल्यानंतर येणाऱ्या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज उपलब्ध होतील.

संपूर्ण कागदपत्रे पाहण्यासाठी क्लिक करा


हे माहित आहे का?

  • RTE प्रक्रिये अंतर्गत दिव्यांग मुलांना 25% प्रवेशासाठी अर्ज भरता येतो.
  • RTE प्रक्रिये अंतर्गत घटस्फोटीत महिलांच्या मुलांना 25% प्रवेशासाठी अर्ज भरता येतो.
  • RTE प्रक्रिये अंतर्गत विधवा महिलांच्या मुलांना 25% प्रवेशासाठी अर्ज भरता येतो.
  • RTE प्रक्रिये अंतर्गत अनाथ मुलांना 25% प्रवेशासाठी अर्ज भरता येतो.

हे ही वाचा 

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने