असा भरा आरटीई 25 % ऑनलाईन फॉर्म | संपूर्ण माहिती | RTE Online Form Process

RTE Online Form Process: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत [RTE-2009] राज्यातील खाजगी शाळांमध्ये वंचित व आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव 25 टक्के जागांसाठी ऑनलाईन प्रवेश येते.  शैक्षणिक वर्ष 2024-25  मध्ये 975000 पेक्षा जास्त जागावर  मोफत प्रवेश दिला जाणार आहे. Online Form भरताना पालकांना अनेक अडचणी येतात. पहिल्यांदा Form भरत असल्याने अनेकदा कोणती माहिती भरावी हे लक्षात येत नाही. त्यामुळे याठिकाणी RTE  Form Online Process याठिकाणी स्टेप बाय स्टेप सांगितली आहे. 

जॉईन करा

RTE Online form Process 2023-24
RTE Online form Process 2023-24

असा भरा आरटीई 25 % ऑनलाईन फॉर्म | संपूर्ण माहिती | RTE Online Form Process

स्क्रीन शॉट पाहत पाहत पालकांना सहज Online Form भरता येईल. 

पूर्व माहिती

 RTE 25% ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रथम विद्यार्थ्याच्या नावाने रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आ.हे त्या शिवाय Form भरता येत नाही म्हणून नोंदणी करण्यासाठी गुगल मध्ये  खालील कोणतीही एक RTE वेबसाईट लिहून सर्च करावे. 

RTE WEBSITE

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login

 या वेबसाईटवर क्लिक करावे. आपणासमोर खालील चित्रामध्ये दिसेल अशी वेबसाईट ओपन  होईल त्यानंतर  उजव्या बाजूला Online Application वर क्लिक करावे.

महत्वाच्या सूचना

याठिकाणी काही महत्वाच्या सूचना आहेत. फॉर्म भरणे किंवा नोंदणी करणे यापूर्वी आपण त्या वाचाव्यात.

  • सन 2024-25  या वर्षाकरिता आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी दिनांक 16 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024  पर्यंत मुदत आहे.
  • पालकांनी अर्ज भरण्यापूर्वी आरटीई पोर्टल च्या होम पेजवरील आवश्यक कागदपत्रे आणि FAQ यावर क्लिक करून त्यामधील सर्व सूचना वाचणे आवश्यक आहे.
  • पालकांनी जवळच्या मदत केंद्रावर जाऊन प्रवेश पात्र बालकांचा अर्ज भरावा.
  • बिनचूक पणे आपण स्वतः भरू शकत असाल तर स्वतः भरावे.
  • एका बालकाकरिता एकच अर्ज भरण्यात यावा एकाच बालकाचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द करण्यात येतील.
  • प्रवेश अर्ज भरताना चुकल्यास तो रद्द (डिलीट एप्लीकेशन ) करून पुन्हा भरावा कोणत्याही परिस्थितीत डुप्लिकेट अर्ज भरू नयेत.
  • प्रवेश अर्जात घराचा पत्ता लिहिताना रहिवासी पुरावा म्हणून कोणते कागदपत्र देणार आहे त्यावरील पत्ता अचूक भरावा.
  • पालकांनी प्रवेश अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावी
  • उत्पन्नाचा दाखला आणि जातीचे प्रमाणपत्र परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • यापूर्वी आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज भरू नये.

विद्यार्थी नोंदणी Student Registration

ऑनलाइन अँप्लिकेशन [ONLINE APPLICATION] वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल.

NEW REGISTRATION PAGE
NEW REGISTRATION PAGE

वरीलप्रमाणे आलेल्या पेजवर NEW Registration या वर क्लिक करावे. इथे आपणास विद्यार्थ्याची माहिती भरावयाची आहे.

प्रथम आपला जिल्हा निवडावा आणि  विद्यार्थ्याचे नाव (आडनाव, पहिले नाव आणि मधले नाव याप्रमाणे)  विद्यार्थी दिव्यांग असेल तर Yes नसेल तर No वर टिक करून जन्मदिनांक अचूक भरावी. दिलेला कॅप्चा अचूक भरून आपला 10 अंकी चालू नबर लिहावा त्यानंतर रजिस्टर वर क्लिक करावे.

रजिस्टर वर क्लिक केल्यानंतर आपण नोंद केलेल्या मोबाईल नंबर वर यूजर आयडी व पासवर्ड एसएमएस द्वारे पाठवला जाईल. या शिवाय रजिस्टर नंतर येणाऱ्या पेजवर सुद्धा आपला फॉर्म नंबर आणि पासवर्ड दर्शविला जातो

  • प्राप्त झालेला युजर आयडी व पासवर्ड लॉगिन पेजवर भरून कॅपच्या टाकावा व लॉगिन करावे

RTE Online Form Process

लॉगिन केल्यानंतर पासवर्ड बदलण्यासाठी सूचना येईल दिलेल्या माहितीप्रमाणे नवीन पासवर्ड भरून सबमिट करावे. नवीन पासवर्ड लक्षात ठेवावा. याठिकाणी  गोंधळून जाऊ नये. इथे बालकाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. नोंदणी केली म्हणजे Application Form भरला असे समजू नये. Application Form  भरण्यासाठी पुढील प्रक्रिया करावी.

Application Form भरणे
Application Form भरण्यासाठी युजर आयडी व आपण बदललेला पासवर्ड लिहल्यानतर कॅपच्या कोड भरून लॉगिन करावा. लॉगिन झाल्यानंतर आपल्यासमोर पुढील माहितीचे टप्पे दिसतील.

  • Child information
  • Application
  • School selection
  • Form submission
  • Admit Card व इतर माहिती.

वरील दिलेल्या सर्व ठिकाणी माहिती भरावयाची असल्याने ती माहिती अचूक भरावी. विद्यार्थी माहिती भरताना कागदोपत्री अचूक असलेली माहिती भरावी माहितीमध्ये तफावत आल्यास प्रवेशावेळी अडचण येऊ शकते त्यामुळे माहिती भरताना काळजीपूर्वक माहिती भरावी

Child information विद्यार्थी माहिती.

Child Information  या पेजवर मुलाची माहिती भरताना  ऑलरेडी मुलाचे आलेल्या असेल त्यावर आपण टॅबचा वापर करून पुढे गेलो की मराठीत नाव आलेले दिसेल. 

  • आईचे पूर्ण नाव लिहावे.
  • वडिलांचे पूर्ण नाव लिहावे.
  • मुलाची जन्मदिनांक ऑटोफिल मध्ये आली असेल.
  • बालकाचे  (GENDER) लिंग निवडावे (मुलगा मुलगी) 
  • मुलाचे वय दिलेल्या तारखेनुसार आलेले असेल 
  • पेरेंट स्टेटस  या ठिकाणी सामान्य पालक (General), विधवा (Widow), घटस्फोटित (Divorcee), अनाथ (Orphan), एकल पालक (Single Parent) असे पर्याय आहेत त्यापैकी एक निवडावा.

सध्याचा पत्ता पूर्ण लिहावा त्यामध्ये लॅटिट्युड आणि लॅगीट्युड यात कोणतीही महिती भरू नये.त्याचबरोबर सर्वात खाली लाल अक्षरातील सूचना महत्वाची आहे यापूर्वी आरटीई 25% अंतर्गत प्रवेश घेतला आहे काय या समोर नाही अशी क्लिक करावे. 

पालकांनी आपला राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग SAVE करावे त्यानंतर  SAVE / EDIT GOOGLE ADDRESS या पेजवर क्लिक करून आपल्या घराच्या ठीक पत्त्याच्या ठिकाणी 🎈 लोकेशन बलून सेट करावे.


गुगल मॅप मध्ये लाल बोलून अचूक ठिकाणी सेव करावा save आणि close या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर येणार छोट्या पॉपअप वर ok क्लिक करावे. पुढे जाण्यासाठी SAVE बटणावर क्लिक करावे. इथे विद्यार्थी माहिती पूर्ण होते.

Application माहिती भरणे 

एप्लीकेशन या टॅब वर क्लिक करून माहिती भरावी.  या पेजवर ॲप्लीकेशन मध्ये इयत्ता अचूक निवडावी.
RTE अंतर्गत प्ले ग्रुप, KG, Jr KG, Sr KG, आणि इयत्ता पहिली साठी प्रवेश दिला जातो. त्यामुळे अचूक वर्ग निवडावा.
  • शाळेचे माध्यम अचूक निवडावे.
  • शाळेचे दुसरे माध्यम निवडावे.
  • धर्म अचूक निवडावा. (कागदपत्रे पाहून भरावे)
  • जातीचा संवर्ग (कॅटेगरी) अचूक निवडावी. (जातीचे प्रमाणपत्र प्रवेशावेळी सदर करावे लागते)
  • बालकाचे आधार क्रमांक असेल तर लिहावा नसेल तर नाही या बटनावर क्लिक करावे.  याशिवाय PAN Card आणि इमेल ID असल्यास तो इथे नोंदवावा.
  • पूर्ण माहिती भरल्यानंतर save या बटनवर क्लिक करावी.

  • एप्लीकेशन भरताना विद्यार्थी जर दिव्यांग असेल तर त्याचा प्रकार निवडावा.
  • प्रवेशावेळी दाखल करावयाची प्रमाणपत्र निवडावी.
  • पुढे जाण्यासाठी save या बटनवर क्लिक करून पुढे जावे

SCHOOL SELECTION शाळेची निवड

अर्जाची माहिती भरल्या नंतर School Selection म्हणजेच शाळेची निवड या टॅब वर क्लिक करा दिलेल्या इमेज प्रमाणे पात्र शाळांची यादी दिसेल. त्याच बरोबर अपात्र शाळांची यादी सुद्धा दिसेल.

शाळा निवडण्यासाठी प्रथम 1 कि.मी /3 कि.मी./Greater than3 कि.मी. या tab वर click करून शाळा निवडावी आणि Save या बटनावर Click करावे. पालकांना 10 शाळा निवडता येतील.

> सदरचे अंतर हे हवाई अंतर असून रस्त्याने शाळा व घर यामधील अंतर 1 कि. मी. किंवा 3 कि. मी. पेक्षा जास्त असू शकते, त्यामुळे शाळा निवडताना पालकांनी काळजी घ्यावी.

> शाळा निवडताना पालकांनी कमीत कमी एक शाळा निवडावी व जास्तीत जास्त दहा शाळा निवडता येतील.

> शाळांची निवड केल्यानंतर Save बटण वर क्लिक केल्यानंतर निवडलेल्या शाळांची यादी पाहण्यासाठी School Selection वर क्लीक केल्यावर निवडलेल्या शाळांची यादी दिसेल.

पात्र शाळेची यादी भरताना दिलेल्या चेक्स बॉक्समध्ये सिलेक्ट करून SAVE या बटनावर क्लिक करावे. शाळेच्या नावावर क्लिक केल्यानंतर शाळेविषयी माहिती पहावयास मिळेल. त्यामध्ये शाळेचे नाव पत्ता, अंतर, माध्यम, इयत्ता इत्यादी माहिती दिसेल.

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी इथे क्लिक करा 

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login

Form Submission अर्ज सबमिट करणे

या वर क्लिक केल्या नंतर आपण भरलेली माहिती दिसेल. शेवटी ऑनलाइन फॉर्म भरून झाल्यानंतर अर्जाचा तपशील किंवा समरी किंवा सबमिशन वरील कन्फर्म बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.

अर्जात नमूद केलेली माहिती माझ्या ज्ञानाप्रमाणे सत्य आहे. माहिती चुकीची आढळून आल्यास अर्ज प्रवेशासाठी रद्द होईल आणि त्यास मी सर्वस्वी जबाबदार राहील. अशा प्रकारची माहिती दिसेल नंतर त्या समोरील चेकबॉस वर टिक करायचा आहे.
केल्यानंतर आरटीई पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरला आहे. अर्ज अर्जात भरलेली माहिती सर्व खरी असून लॉटरी लागल्यानंतर प्रवेश घेताना भरलेली माहिती खोटी आढळून आल्यास आणि या बालकाची एकापेक्षा जास्त भरलेले अर्ज आढळल्यास आर टी ईअंतर्गत मिळालेला प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीरता कायदेशीर कारवाई होऊ शकेल याची मला संपूर्ण कल्पना आहे.
अशा प्रकारचे माहिती होईल त्यानंतर कन्फर्म आणि सबमिशन या बटणावर क्लिक करायचं आहे

कन्फर्म केल्यानंतर अर्जात कोणताही बदल करता येत नाही. कन्फर्म केल्यानंतर आपण भरलेल्या अर्जाची pdf जनरेट करता येते. जनरेत केलेली pdf खालीलप्रमाणे दिसेल.

ADMIT CARD

लॉटरीद्वारे निवड झाली असल्यास विद्यार्थी लॉगिनद्वारे ऍडमिट कार्ड या पर्यायावर क्लिक करून ऍडमिट कार्ड डाउनलोड करा व त्याची प्रत घेऊन मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रती घेऊन ब्लॉक कमिटी कार्यालय येथे प्रवेश निश्चित करण्यासाठी दिलेल्या कालावधीत पालकांनी संपर्क करावा. ऍडमिट कार्डचा नमुना

जर पालकांना प्रवेशाबाबत कोणतीही तक्रार असेल किंवा शाळा प्रतिसाद देत नसतील तर पालक आपल्या तक्रारी ग्रीव्हियन्स या पर्यायामार्फत ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात.
 हे हि वाचा 

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 


Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने