RTE Online Admission 2024: मोफत प्रवेशासाठी दोन दिवसात ११४०० ऑनलाइन अर्ज आरटीई पोर्टलवर दाखल

RTE Online Admission Portal: बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा आधिकार कायद्यानुसार राज्यामध्ये RTE Online Admission 2024 प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये आरटीई प्रवेशाबाबत बदल करण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील 76 हजार पेक्षा जास्त शाळांनी नोंदणी केली आहे. त्या अंतर्गत राज्यभरात 8 लाख 86 हजार 417 जागा आरटीई अंतर्गत लॉटरी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. 

जॉईन करा

RTE Online Admission 2024
RTE Online Admission 2024

RTE Online Admission 2024: मोफत प्रवेशासाठी दोन दिवसात ११४०० ऑनलाइन अर्ज आरटीई पोर्टलवर दाखल 

दिनांक 16 एप्रिल पासून आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दोन दिवसात  आरटीई पोर्टलवर 11 हजार 400 पेक्षा जास्त अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आरटीई पोर्टलवर अर्ज करण्याची तारीख व ऑनलाइन फॉर्म भरण्याची लिंक खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. 

RTE Online Admission Form Link 

आरटीई अंतर्गत लॉटरी पद्धतीने फॉर्म भरण्याची लिंक https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login अशी आहे. पालकांनी मोफत प्रवेशासाठी वरील लिंकवर क्लिक करून आपले अर्ज भरावे. 

RTE Online Form Last Date 

आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया दिनांक 16 एप्रिल पासून सुरू करण्यात आली असून अंतिम दिनांक 30 एप्रिल 2024 देण्यात आली आहे. या काळात पालकांना शिक्षण विभागाच्या https://student.maharashtra.gov.in/ साइटवर सुविधा उपलबद्ध करून देण्यात आली आहे. 

RTE Online Admission कोणासाठी?

वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास घटकतील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत लॉटरी पद्धतीने 25% प्रवेश दिला जातो.  यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती ब,  भटक्या जमाती  कम  भटक्या जमाती ड, ओबीसी, एसबीसी, दिव्याग, अनाथ, HIV बाधित/प्रभावित. कोव्हिड प्रभावित बालके यांचा समावेश होतो. 

RTE Online Form कसा भरावा?

  • आरटीई अंतर्गत लॉटरी पद्धतीने फॉर्म पुढील  लिंक https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login वरून भरता येतो त्यासाठी खालील पायरीनुसार फॉर्म भरावा. 
  • पायरी 01  : सर्व प्रथम वरील लिंकवर क्लिक करून NEW REGISTRATION वर क्लिक करावे 
  • पायरी 02 : जिल्हा निवडावा व विद्यार्थी विषयी संपूर्ण माहिती भरावी.  विद्यार्थी दिव्याग (अपंग) असल्यास yes लिहावे.
  • पायरी 03 : Captcha लिहावा. त्याचबरोबर चालू असलेला मोबाइल नबर लिहून सबमीट करावे.  
  • पायरी 04 : आता आपल्या स्क्रीनवर लाल अक्षरामद्धे आपला फॉर्म नंबर आला असेल त्याचबरोबर आपण नोंदवलेल्या मोबाइल नबरवर आपला युजर नेम व पासवर्ड आला असेल. 
  • पायरी 05: मोबाइल नबरवर आलेला युजर नेम व पासवर्ड लॉगिन बॉक्स मध्ये लिहून लॉगिन करावे. 
  • पायरी 06: लॉगिन केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर पासवर्ड बदलण्याबाबत विंडो ओपन जाल असेल. त्यात नोंदणीच्या आलेल्या मॅसेज मधील जून पासवर्ड आणि आपला नवीन पासवर्ड बदलून घ्यावा. 
  • पायरी 07: नवीन टाकलेल्या पासवर्ड नुसार पुनः लॉगिन करावे. 
  • पायरी 08 : आता आपल्यासमोर फॉर्म आलेला दिसेल. पूर्ण भरावा. सेव्ह केल्यानंतर खालील बाजूस आलेल्या गूगल मॅप वरुन आपले लोकेशन निवडावे. 
  • पायरी 09: या फॉर्ममध्ये खालील बाबी आहेत. 

  1. Child Information
  2. Application 
  3. School Selection
  4. Form Submissions
या बाबी दिसून येतील या पूर्ण व अचूक भराव्यात  आणि फॉर्म सबमीत करावे. 
लक्षात घ्यावे की सर्व कागदपत्रे ही फॉर्म भरण्यापूर्वीच्या तारखेची असावीत. 


Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने