RTE Online Admission 2024-25: अखेर!! आरटीई २५% प्रवेशासाठी ऑनलाइन फॉर्म सुरू

RTE Online Admission: अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असणाऱ्या पालकांना आनंदाची बातमी समोर आली आहे.  सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियम (RTE 2009) नुसार  दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये अंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरीताची प्रक्रिया सुरु करणेबाबत शासनाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील आणेक पळकणा दिलासा मिळाला आहे.  फॉर्म लिंक व तारीख खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. 

जॉईन करा

RTE Online Admission 2024-25
RTE Online Admission 2024-25

RTE Online Admission 2024-25 : अखेर!! आरटीई २५% प्रवेशासाठी ऑनलाइन  फॉर्म सुरू

दरवर्षी प्रमाणे सुधारित अधिसूचना दिनांक 09 फेब्रुवारी 2024 नुसार सन 2024-25 या वर्षांची RTE 25%  Admission प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियअंतर्गत दिनांक16 एप्रिल 2024 ते 10 मे  2024 या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.

RTE फॉर्म भरण्यासाठी लिंक 

पालकानी ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावे 

RTE Admission 2024-25 Registration Link क्लिक करा

RTE Admission 2024-25 Registration Link for Parent Student  क्लिक करा

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login

RTE फॉर्म भरण्यासाठी महत्वाची सूचना 

  • एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही .
  • एका बालकाचा एका पेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील. 
  • जन्म तारीख अथवा मोबाईल भरताना चुकल्यास तो अर्ज Delete करून पुन्हा नवीन अर्ज भरावा. 

  • दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना पालकांनी Child Disability - Yes यावर क्लिक करावे 
  • सर्व कागदपत्रे ही फॉर्म भरण्याच्या तारखे पूर्वीची असावी 

RTE Online Admission 2024-25 Video 

पालकांकरीता सूचना (2024-2025)

  • आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2024-2025  या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.
  • पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.
  • आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.
  • 1 कि.मी, 1 ते 3 कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10 च शाळा निवडाव्यात.
  • अर्ज भरत असताना  आवश्यक कागदपत्र   पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.
  • अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
  • एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे  २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे  दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज  लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
  • अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला  मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
  • अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.
  • अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .
  • RTE २५ % प्रवेश 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30/04/2024 पर्यंत राहील.
  • दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
  • सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .
  • सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
  • अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.
  • image not found बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित rtemah2020@gmail.com OR educom-mah@mah.gov.in वर इमेल पाठवावा.

RTE प्रवेशासाठीच्या शाळा 

अनुशाळा व्यवस्थापन
1महानगरपालिका शाळा (Municipal Corporation)
2नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत शाळा
3कंटोमेंट बोर्ड शाळा
4जिल्हा परिषद शाळा
5महानगरपालिका शाळा (स्वयं अर्थसहाय्यीत शाळा)
6जिल्हा परिषद (माजी शासकीय शाळा)
7खाजगी अनुदानित शाळा
8स्वयंअर्थसहाय्यीत शाळा Self Finance school
9पोलीस कल्याणकारी शाळा

जिल्हा निहाय जागा 

जिल्हा RTE शाळा  प्रवेश जागा 
Ahmadnagar 4054 51351
Akola 1214 13838
Amravati 1997 23494
Aurangabad 2832 40764
Bhandara 955 13366
Bid 2817 31817
Buldana 1778 29371
Chandrapur 1846 15625
Dhule 1344 22834
Gadchiroli 1574 12949
Gondiya 1225 15205
Hingoli 998 15677
Jalgaon 2306 47814
Jalna 1830 25514
Kolhapur 2555 22463
Latur 1737 28440
Mumbai 1319 32207
Mumbai 64 1181
Nagpur 2618 22616
Nanded 2721 31684
Nandurbar 1507 21246
Nashik 4014 60296
Osmanabad 1263 14763
Palghar 2419 32064
Parbhani 1399 26990
Pune 5153 77927
Raigarh 2909 23586
Ratnagiri 2431 12345
Sangli 2134 30582
Satara 3024 27929
Sindhudurg 1425 6252
Solapur 3387 44190
Thane 2617 43686
Wardha 1118 10173
Washim 950 14115
Yavatmal 2440 28469
Total 75974 972823




Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने