RTE 25% फॉर्म भरण्यासाठी आज शेवटचा दिवस | RTE 25% Admission 2023-24

RTE 25% फॉर्म भरण्यासाठी आज शेवटचा दिवस  | RTE 25% Admission 2023-24 RTE ऑनलाइन प्रोसेस सुरू झालेली असून दिनांक 25 मार्च 2023 पर्यंत पालकांना RTE Online Form भरता येणार आहेत, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी नामांकित खाजगी शाळेमधून आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या RTE 25% ADMISSION योजनेचा लाभ घ्यावा. 


RTE 25% Admission 2023-24
RTE 25% Admission 2023-24


फॉर्म भरण्यासाठी लिंक खाली दिली आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षासाठी राज्यभरामध्ये आठ हजार 827 शाळामध्ये  1 लाख एक हजार 969 जागा RTE 25% नुसार नामांकित शाळेमध्ये मोफत प्रवेश देऊन भरल्या जाणार आहेत. यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना ही प्रवेश दिला जाणार आहे.

RTE 25% प्रवेश ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरु | RTE 25% Admission 2023-24

Right To Education(RTE) शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार नर्सरी, ज्युनिअर KG आणि इयत्ता पहिली ला Admission घेता येतो.

RTE 25% Admission 2023-24 संपूर्ण सूचना  वाचा 


ऑनलाइन अर्जांसाठी अंतिम मुदत 25 मार्च आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. आरटीई प्रवेशांसाठीची शाळा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विद्यार्थी नोंदणी कधी सुरू होणार या कडे पालकांचे लक्ष लागले होते. प्रवेशासाठी मुलाचे आधारकार्ड स्वीकारण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून सूचना देण्यात आल्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पालकांना 01 मार्च ते 25 मार्च या कालावधीत अर्ज करता येईल.

पालकांसाठी महत्वाचे - वंचित आणि दुर्बल घटकांमध्ये मोडणाऱ्या बालकांना आरटीई मध्ये मोफत प्रवेश दिला जातो. या वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालका व्यतिरिक्त विमुक्त जाती (अ) भटक्या जमाती (ब, क,ड)  इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, एच आय व्ही बाधित किंवा प्रभावित बालके यांचा वंचित गटामध्ये समावेश होतो तर दुर्बल गटामध्ये ज्या बालकांच्या पालकांचे /पालन पोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे अशा बालकांचा समावेश होतो.  त्याशिवाय एसइबीसी प्रवर्गाच्या बालकांना आर्थिक दुर्बल गटामधून प्रवेश अर्ज भरता येतो.

ऑनलाईन अर्ज इथून भरा. 
खाली दिलेल्या online वर क्लिक करावे. 


वरील दोन्हीपैकी कोणत्याही एका ठिकाणी क्लिक केल्यानंतर येणाऱ्या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज उपलब्ध होतील.

संपूर्ण कागदपत्रे पाहण्यासाठी क्लिक करा


इथे वाचा RTE 25% प्रवेश साठी कोणती मुले पात्र

 ठळक मुद्दे

◼ RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण नर्सरी, ज्युनिअर KG आणि इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मोफत

◼ कुठलेही शुल्क नाही !

◼ SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.

◼ कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.

◼ खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.

◼ Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी

R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत 25% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)

येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • निवडणुक ओळखपत्र
  • वीज बील
  • घरपट्टी, Tax पावती
  • पाणीपट्टी
  • वाहन चालवण्याचा परवाना

महत्वाचे - RTE 25% प्रवेशासाठी 2023 - 24 या वर्षासाठी बालकाचा जन्म दिनांक 01 जुलै 2016 ते दिनांक 31 डिसेंबर 2017 या दरम्यान असावा. 

पाल्याचा जन्माचा दाखला

  • पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो
  • पालकाचा जातीचा दाखला (फक्त SC/ST)
  • एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (ओपन, ओबीसी)
  • ऑनलाईन पध्दतीने application करू शकता.

जिल्हा निहाय जागा इथे पहा 

District RTE Schools RTE Vacancy
Ahmadnagar 364 2825
Akola 190 1946
Amravati 236 2305
Aurangabad 547 4073
Bhandara 89 763
Bid 225 1827
Buldana 227 2246
Chandrapur 186 1503
Dhule 93 1006
Gadchiroli 66 462
Gondiya 131 864
Hingoli 75 539
Jalgaon 282 3122
Jalna 284 2273
Kolhapur 325 3270
Latur 200 1669
Mumbai 272 5202
Mumbai 65 1367
Nagpur 653 6577
Nanded 232 2251
Nandurbar 45 340
Nashik 401 4854
Osmanabad 107 877
Palghar 266 5483
Parbhani 155 1056
Pune 936 15655
Raigarh 264 4256
Ratnagiri 92 929
Sangli 226 1886
Satara 217 1821
Sindhudurg 49 287
Solapur 295 2320
Thane 629 12278
Wardha 111 1111
Washim 99 786
Yavatmal 194 1940
Total 8828 101969


हे ही वाचा 

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 


Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने