आरटीई प्रवेशासाठी आधार कार्डचे नियम बदलले | Aadhar Card Compulsory For RTE Admission 2023-24

आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023 - 24  सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. राज्यभरामध्ये 101969 बालकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.   आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश करिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी Online Form भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. अशा स्पष्ट सूचना डायरेक्टर ऑफिसकडून देण्यात आले आहेत.

{tocify} $title={मुख्य मुद्दे इथे पहा}

RTE 25%AADHAR CARD RULES
RTE 25% AADHAR CARD RULES


आरटीई प्रवेशासाठी आधार कार्डचे नियम बदलले | Aadhar Card Compulsory For RTE Admission 2023-24


बालकांचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्म तारखेचा पुरावा ही कागदपत्रे आरटीई प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत.

आरटीई प्रवेशासाठी आधार कार्डचे नियम 

  • आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी किंवा पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे.
  • परंतु काही कारणामुळे बालक किंवा पालक आधार कार्ड सादर करू शकणार नाहीत तर अशा प्रकरणामध्ये बालकांचे किंवा पालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटींवर बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. 
  • तसेच सदर आधार कार्ड हे प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे.
  • शाळेने बालकाचे आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा.
  • सदर बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास आरटीई 25 % अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी.
  • म्हणजेच आधार कार्ड काढणे अनिवार्य आहे. परंतु आधार कार्ड नसेल तर पालकांनी 90 दिवसाच्या कालावधी मध्ये आधारवकार्ड काढून प्रवेश मिळालेल्या  शाळेत जमा करावयाचे आहे.

आरटीईचे पर्यायी नवीन पोर्टल इथे आहे

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex

अनाथ बालके 

वंचित घटकातील अनाथ मुलांसाठी 2023-24 पासून आरटीई 25 % प्रवेश प्रकियेत समावेश करण्यात आला आहे. अनाथ बालकांच्या बाबतीत कागदपत्रे जमा करतांना अडचणी निर्माण होउ शकतात म्हणून याविषयी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

अनाथ बालकांना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे.

  • अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालय किंवा बाल सुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावी.
  • जर बालक अनाथालयात किंवा बालसुधारगृहात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ कर्ताग त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील.
  • अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदा. वार्षिक उत्पन्नाचा दाखला ई विचारात घेण्यात येऊ नये.

कोव्हिड प्रभावित बालक

नवीन वर्षांमध्ये RTE 25% ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत  कोव्हीड प्रभावित बालकांचा समावेश करण्यात आले आहे. कोव्हीड प्रभावित बालकांमध्ये  ज्या मुलांचे पालक (एक किंवा दोनही) ज्यांचे मृत्यू 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोरोनच्या प्रादुर्भावामुळे झालेला आहे.

कोव्हिड प्रभावित बालकांच्या प्रवेशकरिता आवश्यक कागदपत्रे

  • सक्षम प्राधिकारी यांचे निर्गमित केलेले संबंधित मृत्यू प्रमाणपत्र.
  • कोव्हिड 19 मुले मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र (medical certificate of cause of death (form No 04)
  • सदर मृत्यू कोव्हिड 19 शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे शासकीय / पालिका / महानगरपालिका / रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय किंवा प्रयोगशाळा यांचा अहवाल. असे कागदपत्रे कोव्हिड प्रभावित बालकाच्या प्रवेशवेळी जोडवायची आहे.



RTE Admission Portal Update  आरटीई 25 टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे तरी याबाबत पालकांनी कोणतीही भीती /संभ्रम बाळगू नये. तसेच ज्या बालकांची प्रवेशासाठी सोडत ( लॉटरी )द्वारे निवड झाली आहे अशा बालकांना शाळा प्रवेशाकरिता पुरेसा कालावधी देण्यात येईल.

असे RTE Admission Portal Update  शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. त्यानुळे नक्कीच वेळ वाढून मिळणार आहे. असे असले तरी पालकांनी खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार आपला प्रवेश निश्चित करावा.

RTE प्रवेशाचे पूर्व नियोजित वेळापत्रक 


अनुतपशीलकालावधी
01लॉटरीचा SMS12 एप्रिल 2023 
02प्रमाणपत्र पडताळणी13 ते 25 एप्रिल 2023
03प्रत्यक्ष प्रवेश25 ते 30 एप्रिल 2023

RTE बाबत महत्वाच्या लिंक
 

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने