RTE Online Form भरताना चुका झाल्या? घाबरू नका. अशी करा दुरुस्ती!

राज्यभरात RTE 25% प्रवेश प्रक्रिया दिनांक 01 मार्च 2022 पासून सुरु झाली आहे. राज्यभरामध्ये 8 हजार 827 शाळामध्ये  1 लाख एक हजार 969 जागा RTE 25% नुसार नामांकित शाळेमध्ये Free Admission देऊन भरल्या जाणार आहेत. यामध्ये दुर्बल व वंचित घटकातील बालकाबरोबर दिव्यांग, अनाथ,कोव्हीड प्रभावित बालके, HIV प्रभावित, घटस्फोटीत महिलांचे बालके, विधवा स्त्रियांची बालके विद्यार्थ्यांना ही प्रवेश दिला जाणार आहे.

RTE FORM CORRECTION
RTE FORM CORRECTION

आरटीई २५% प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याचा कालावधी दिनांक 01 मार्च 2023 ते 17 मार्च 2023  आहे या दरम्यान पालकांनी ऑनलाईन भरावयाचे आहे.

RTE Online Form भरताना चुका झाल्या? घाबरू नका. अशी करा दुरुस्ती!

पालकांना या वर्षी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी केवळ 17 दिवस मिळणार आहेत. घाई घाईने RTE  Online Form भरताना चुका होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. Form भरताना चुका झाल्या तर प्रवेशावेळी त्रुटी निघू शकतात आणि  विद्यार्थ्याच्या प्रवेशावर परिणाम होत असतो. त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरताना अचूक भरणे आवश्यक आहे.

हे ही वाचा 

आरटीई ऑनलाईन फॉर्म भरताना चुक झाल्यास पालक गोंधळून जातात आणि form भरण्याचे अर्धवट सोडून देतात. त्यामुळे बालकाचे नुकसान होते. बालके पात्र राहूनही त्यांना मोफत प्रवेश पासून वंचित राहू शकतात. त्यामुळे  RTE Form भरताना चुका झाल्या? घाबरू नका. अशी करा दुरुस्ती!

RTE Online Form भरताना चुका झाल्या? घाबरू नका. अशी करा दुरुस्ती!

NEW REGISTRATION करताना शक्यतो चुका होऊ शकतात. formमध्ये Child information,  Application, School selection किंवा Form submission करताना चूक होऊ शकते.  ही चूक दुरुस्त करण्याची पद्धती माहित नसल्याने गोंधळ होऊ शकतो. कारण एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही.

घाबरू नका. अशी करा दुरुस्ती!

  • युजरनेम आणि पासवर्ड टाकून SIGN IN करावे.
  • SIGN IN केल्यानंतर खालील चित्रामध्ये दाखवल्या प्रमाणे LOGOUT च्या पुढील बाजूस DELETE APPLICATION दिसेल त्यावर क्लिक करून पूर्ण अर्ज  डिलीट करावा.

  • पुन्हा नव्याने NEW REGISTRATION करावे.
  • अचूक माहिती भरावी.

लक्षात असुद्या - एकदा सबमिट केलेला  फॉर्म पुन्हा डिलीट करता येत नाही. तसेच एका बालकाचा  अर्ज एका पेक्षा जास्त भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील.

म्हणून अचूक अर्ज भरावा. चुका झाल्यास गोंधळून जाऊ नये. वरीलप्रमाणे अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा. आणि पुन्हा नव्याने भरावा. 
 हे हि वाचा 

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 


Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने