इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल जाहीर! इथे पहा निकाल | Scholarship Exam 2023 Result Declare

Scholarship Exam 2023 Result Declare: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि परीक्षा इयत्ता आठवीचा अंतरिम निकाल आज दिनांक शनिवार दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी परीक्षा परिषदेच्या खालील संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. 

Scholarship Exam 2023 Result  Declare
Scholarship Exam 2023 Result  Declare

इयत्ता पाचवी आठवी  शिष्यवृत्ती परीक्षा  निकाल जाहीर! इथे पहा निकाल | Scholarship Exam 2023 Result Declare 

MH Scholarship Exam 2023  इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीचा निकाल शाळांना त्यांच्या लॉगिन मधून तसेच पालकांना आपल्या पाल्याचा निकाल खालील संकेतस्थळावर पाहता येईल.

इथे पहा निकाल 

https://2023.mscepuppss.in/StudentResult.aspx

विद्यार्थ्यांनी वरील लिंकवर क्लिक करून आपला 11 अंकी बैठक क्रमांक टाकावा. Submit केल्यानंतर लगेच आपला निकाल दिसेल. 

शाळांसाठी 

https://2023.mscepuppss.in/LoginPage.aspx

शाळांनी वरील लिंकवर क्लिक करून आपला UDISE कोड आणि पासवर्ड टाकावा .Submit  केल्यानंतर लगेच आपला निकाल दिसेल

गुण पडताळणी  Scholarship Exam 2023 Result

विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिन मध्ये 29 एप्रिल 2023 ते 09 मे 2023 या कालावधीत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या मुख्याध्यापकांना भेटावे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपर करिता 50 रुपये प्रमाणे शुल्क रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

नावात दुरुस्ती  Scholarship Exam 2023 Result

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी /ग्रामीण अभ्यासक्रम इत्यादी मध्ये दुरुस्तीसाठी 29 एप्रिल 2023 ते 09 मे 2023 पर्यंत संबंधी शाळेच्या लॉगिन मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठवल्यास स्वीकारले जाणार नाहीत.

प्रसिद्धी पत्रक पहा

Scholarship Exam 2023 Result Declare
Scholarship Exam 2023 Result Declare 

पडताळणी व दुरुस्ती मुदत Scholarship Exam 2023 Result

दुरुस्तीसाठी 29 एप्रिल 2023 ते 09 मे 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. विहित मुदतीत नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाइन प्राप्त झालेले अर्जानुसार गुण पडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसापर्यंत कळवण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुण पडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रकातदेण्यात आले आहेत.

हे ही  वाचा 

NMMS EXAM 2022-23 निवड यादी जाहीर.

सामान्य प्रशासन विभागाकडून अनुकंपा भरती आदेश जारी

आरटीई ची तारीख वाढली

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 


3 टिप्पण्या

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने