RTE Admission Date : आरटीई नुसार राज्यातील दुर्बल व वंचित घटकातील 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशाकरिता मुदत वाढ देण्याबाबत नुकताच परिपत्रक जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पालकांना प्रवेशासाठी आजून काही दिवस मिळाले आहेत.
RTE Admission Date Extended |
आरटीई प्रवेशाची तारीख वाढली; पालकांना दिलासा | RTE Admission Date Extended
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार 2023-24 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाइन सोडत बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी जाहीर करण्यात आली असून निवड यादीतील बालकांचे प्रवेश घेण्याची मुदत 13 एप्रिल ते 25 एप्रिल 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
RTE Admission Date Extended Letter |
RTE Admission Date Extended
नवीन परिपत्रकानुसार सन 2023 रोजी शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25% प्रक्रिया अंतर्गत ऑनलाईन सोडती द्वारे निवड झालेल्या यादीतील बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी 08 मे 2023 पर्यंत वाढ देण्यात देण्यात आली आहे. आता पालकांना 08मे 2023 पर्यंत प्रवेश घेता येईल.