Anukampa Niyukti 2023: अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी विहित केलेल्या नियम अटी व अनुकंपा शासन निर्णय नुसार Anukampa Niyukti प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद लातूर अंतर्गत सामान्य प्रशासन विभागाकडून नुकतेच 25 एप्रिल 2023 रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या स्वाक्षरीने अनुकंपा नियुक्ती आदेश जारी करण्यात आले आहेत.
Anukampa Niyukti 2023 |
सामान्य प्रशासन विभागाकडून अनुकंपा नियुक्ती आदेश जारी;विविध पदावर नियुक्त्या | Anukampa Niyukti 2023
सदर Anukampa Niyukti 2023 स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक (कंत्राटी), अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ अभियंता, परिचर आदी पदावर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
पदनिहाय अनुकंपा नियुक्ती संख्या
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक (कंत्राटी), अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ अभियंता, परिचर पदावर 47 उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत,
अनु क्र | पदाचे नाव | नियुक्त संख्या |
---|---|---|
01 | स्थापत्य अभियांत्रिकी सहायक | 04 |
02 | औषध निर्माण अधिकारी | 01 |
03 | कनिष्ठ सहायक (लिपिक) | 09 |
04 | कनिष्ठ सहायक (लेखा) | 02 |
05 | वरिष्ठ सहायक (लिपिक) | 03 |
06 | वरिष्ठ सहायक (लेखा) | 03 |
07 | आरोग्य सहायक (पु.) | 08 |
08 | ग्रामसेवक (कंत्राटी) | 05 |
09 | अंगणवाडी पर्यवेक्षिका | 02 |
10 | कनिष्ठ अभियंता स्थापत्य | 03 |
11 | परिचर | 07 |
Anukampa Niyukti Order 2023
वरील नियुक्त कर्मचार्यांचे आदेश पाहण्यासाठी खालीलप्रमाणे क्लिक करा आणि आदेश पहा.
- उपरोक्त आदेशातील अनुकंपा उमेदवाराना आदेश पारित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत रुजू व्हायचे आहे, रुजू नाही झाल्यास आदेश रद्द करण्यात येणार आहेत.
- सदर अनुकंपा तत्वावर नियुक्त केलेल्या उमेदवारांना मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण आणि सांभाळ करणेबाबत शपथपत्र रुजू झालेनंतर कार्यालय प्रमुखाकडे सादर करावयाचे आहे.
- जर उमेदवार MSCIT पूर्ण केलेला नसेल तर त्यास येत्या दोन वर्षच्या कळतात ही संगणक अर्हता पूर्ण करावयाची आहे