Maharashtra School Result News: शाळेच्या निकालाची तारीख बदलली; आता 'या' दिवशी जाहीर होणार शाळेचा निकाल!!

Maharashtra School Result News:राज्यातील शाळांबाबत व शाळेच्या निकालाबाबत मोठी बातमी आहे. शाळेच्या निकालाची तारीख बदलली; आता 'या' दिवशी जाहीर होणार शाळेचा निकाल!! राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन 2023 ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष 2023-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत दिनांक 20 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयानुसार तपशीलवार सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या दिनांक 20 एप्रिल 2023 रोजीच्या परीपत्रकानुसार निर्गमित करण्यात आले आहेत. 

Maharashtra School Result News
Maharashtra School Result News

Maharashtra School Result News: शाळेच्या निकालाची तारीख बदलली; आता 'या' दिवशी जाहीर होणार शाळेचा निकाल!!

प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या दिनांक 20 एप्रिल 2023 रोजीच्या परीपत्रकानुसार  वरील सूचनांमध्ये सुट्टीचा कालावधी, शाळांचे निकाल जाहीर करणे व शैक्षणिक वर्ष 2023-24 चे आगामी शैक्षणिक वर्ष सुरू करणे इत्यादी बाबतच्या सूचना देण्यात आले आहेत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष 

दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाची सांगता दिनांक 06 मे रोजी आहे. महाराष्ट्र दिन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीवर्ष सांगता पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने खालील काही सूचना निर्गमित करण्यात आले आहेत.

Maharashtra School Result News Letter
Maharashtra School Result News Letter

  • राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर दिनांक 06 मे 2023 रोजी शाळांचा शैक्षणिक वर्ष सन 2022-23 चा निकाल जाहीर करावा. विद्यार्थी पालकांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात यावे तसेच निकालासोबत उपक्रम / कार्यक्रमाचे आयोजन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्यात यावा.


अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट देण्यात आले आहेत. त्यानुसार दरवर्षी 01 मे रोजी जाहीर करण्यात येणारा शाळेचा निकाल यावर्षी 06 मे 2023 रोजी  जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांना निकाल पाहण्यासाठी आजून एक आठवडा प्रतीक्षा करावी लागणार आहे,

हे ही  वाचा 

NMMS EXAM 2022-23 निवड यादी जाहीर.

सामान्य प्रशासन विभागाकडून अनुकंपा भरती आदेश जारी

आरटीई ची तारीख वाढली

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने