Maharashtra school Holiday Declare: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करणे तसेच शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करणे बाबत शासन परिपत्रक नुकताच जारी करण्यात आला आहे.
Maharashtra school Holiday Declared |
मोठी बातमी !!! उष्णतेच्या लाटेमुळे शाळांना उद्यापासूनच सुट्टी जाहीर Maharashtra school Holiday Declared
या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये काही दिवसापासून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याची तसेच शाळा सुरुवात करण्याच्या अनुषंगाने काही सूचना शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत
Maharashtra school Holiday Declared महत्वाच्या सूचना
राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक 21 एप्रिल 2023 पासून म्हणजेच उद्यापासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्याच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.
या तारखेपासून शाळा सुरु NEW Academic Year
राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत एक वाक्यता राहण्याच्या दृष्टीने विदर्भ वगळता सर्व विभागातील शाळा दरवर्षी दिनांक 15 जून रोजी व त्या दिवशी जर सुट्टी असल्यास तर त्याच्या पुढील दिवशी सुरू राहतील विदर्भ विभागातील शाळा दरवर्षी 30 जून रोजी व त्या दिवशी सुट्टी आल्यास त्याच्या पुढील दिवशी शाळा सुरू होतील अशाही सूचना शासन परिपत्रकानुसार देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार पालकांनीही आपल्या पाल्याची काळजी घेतली पाहिजे.