आजपासून "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" | Jai Jai Maharashtra Maza (MAHARASHTRA GEET) | Jai Jai Maharashtra Maza (MAHARASHTRA GEET) - 2023 हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त प्रत्येक राज्याला एक राज्यगीत असावे असे ठरले आहे. त्यानुसार "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" गीताला "राज्यगीत" म्हणून घोषित करण्यात आले आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून हे गीत अंगिकारण्यात येणार आहे.
महत्वाचे राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत/ परिपाठ/ प्रार्थना/ प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले / गायले जाईल
राज्यगीत |
"जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" | Jai Jai Maharashtra Maza (MAHARASHTRA GEET)
"जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" हे स्वर ऐकताच प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभा राहतो आणि उर अभिमानाने भरुन येतो. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला या राज्यात जन्मल्याचा अभिमान वाटायला लागतो.
Jai Jai Maharashtra Maza या गीताची घोषणा झाल्यानंतर आता हे गीत राज्य सरकारच्या अधिकृत कार्यक्रमात राष्ट्रगीतानंतर 'जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत म्हटले जाईल. 1 मे या महाराष्ट्र दिनानंतर या राजशिष्टाचाराचे पालन करणे अनिवार्य असेल असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
गीत | माहिती |
---|---|
गटाचे | जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा... |
गीतकार | राजा |
संगीतकार | श्रीनिवास खळे |
मूळ गायक | शाहीरसाबळे |
सांस्कृतिक कार्य विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" हे आता महाराष्ट्राचे राज्यगीत असेल. कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतामधील 2 चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यगीत गायन, वादन यासंदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
प्रोटोकॉल पहा
शासननिर्णय पहा