प्रयोग यशस्वी!! आता कमी पटसंख्येच्या शाळांसाठी क्लस्टर शाळा - शिक्षणमंत्री केसरकर | Cluster School Scheme

महाराष्ट्रातील कमी पटसंख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण विकास यात राहणारी कमतरता हा मुद्दा शालेय शिक्षण विभागाने ऐरणीवर आणला आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात ‘Cluster School’चा प्रयोग राबविला जाणार आहे.

Cluster School Scheme
Cluster School Scheme

प्रयोग यशस्वी!! आता कमी पटसंख्येच्या शाळांसाठी क्लस्टर शाळा - शिक्षणमंत्री केसरकर | Cluster School Scheme

राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या सुमारे साडेचार हजारांहून अधिक शाळा त्यासाठी विचारात घेण्यात येणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत नुकत्याच ॲम्बी व्हॅली येथे झालेल्या कार्यशाळेत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी हा विषय चर्चेला आणला.

राज्यभरात ५ हजार शाळा?

राज्यभरात 20 विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 04 हजार 895 पेक्षा अधिक शाळा आहेत, त्या शाळांमध्ये 08 हजार 226 शिक्षक आहेत, तर सुमारे 50 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्या प्रत्येकाला शिक्षण ही सरकारची जबाबदारी असली, तरी कमी पटसंख्येमुळे विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यात अडचणी येतात, अशी शिक्षण विभागाची धारणा आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना जास्त विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांमध्ये आणावे, अशी चर्चा या कार्यशाळेत झाली.

पुण्यात पथदर्शी प्रयोग 

पुणे जिल्ह्यात पानशेतजवळ असा पथदर्शी प्रयोग केला असून, तो यशस्वी झाला आहे. आता राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाने विचार सुरू केला आहे. 

What is Cluster School

क्लस्टर शाळा म्हणजे...अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना एकत्र आणणारी एक शाळा म्हणजे ‘क्लस्टर शाळा.’ कमी पटसंख्येच्या शाळा असलेल्या भागातील काही अंतरावरील एक मध्यवर्ती शाळा निवडून त्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. 

प्रवास खर्च सरकार भरणार 

कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावापासून या शाळेत यावे लागते. क्लस्टर शाळेपर्यंत पोचविण्यात विद्यार्थ्यांना येण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांचा प्रवास खर्च सरकारतर्फे करण्याच्या पर्यायाचा विचारही केला जात आहे. 

शिक्षकांचे समायोजन कुठे ?

या प्रक्रियेत कमी पटसंख्येच्या शाळांमधील शिक्षकांना कोणतीही अडचण येणार नाही. त्यांचे क्लस्टर शाळेत किंवा अन्य ठिकाणच्या शाळेत समायोजन करावे, असा पर्याय यावेळी निश्‍चित करण्यात आला.


अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने