'महाज्योती' कडून १५०० विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती प्रशिक्षण | Application for Military Bharti Training 2023-24

मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणा करिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती,  भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2023-24 या वर्षांमध्ये  Military Bharti 2023-24 च्या पूर्वतयारीसाठी MAHAJYOTI कडून Free Training  देण्यात येणार आहे.  त्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

Military Bharti Training 2023-24
Military Bharti Training 2023-24

'महाज्योती' कडून १५०० विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती प्रशिक्षण | Application for Military Bharti Training 2023-24

महाज्योती ही संस्था राज्य शासनाची संस्था असून  इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागांतर्गत सुरू आहे. Mahajyoti ही OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, तसेच SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व प्रशिक्षण देण्याचे काम करते.

Military Bharti Training 2023-24

  • प्रशिक्षणासाठी मंजूर विद्यार्थी संख्या : 1 हजार 500
  • प्रशिक्षणाचा कालावधी : 06 महिने 
  • शिष्यवृत्ती 06 महिने: एकूण 60 हजार
  • आकस्मिक निधी:  12 हजार (एक वेळेस)

Military Bharti Training 2023-24 योजनेच्या लाभासाठी पात्रता

  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.
  • विद्यार्थी नॉन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावा.
  • विद्यार्थी बारावी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा बारावी वर्ग उत्तीर्ण केलेल्या असावा.
  • महाज्योतीच्या कोणत्याही योजनांचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये. त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाळणी परीक्षा द्वारे करण्यात येईल.
  • विद्यार्थ्यांची किमान वय 17 वर्षे व कमाल वय 43 वर्षापेक्षा जास्त असू नये.
  • वैद्यकीय अर्हता
    • किमान - उंची पुरुष 157cm, महिला 152cm
    • छाती 77cm (दीर्घ श्वास घेतल्यानंतर 82cm) केवळ पुरुषाकरिता

लाभार्थी निवड प्रक्रिया Military Bharti Training 2023-24

  • महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • प्राप्त अर्जाची निकषानुसार छाननी करण्यात येईल.
  • छाननी मध्ये पात्र विद्यार्थ्यांची Military Bharti पूर्व परीक्षेच्या धर्तीवर अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल.
  • चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकानुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची यादी व प्रतीक्षा यादी महाजन तिच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा Online Application सुरु इथे करा अर्ज

प्रशिक्षणाचे स्वरूप Military Bharti Training 2023-24

  • विद्यार्थ्यांना मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल.
  • सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिन्यांचा असेल.
  • प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल.
  • प्रशिक्षण हे ऑफलाइन स्वरूपाचे देण्यात येईल.

आरक्षण

सामाजिक प्रवर्ग आरक्षण पुढीलप्रमाणे

Application for Military Bharti Training 2023-24
 Application for Military Bharti Training 2023-24

समांतर आरक्षण Military Bharti Training 2023-24

  • अनाथांसाठी एक टक्के जागा आरक्षित आहेत.
  • प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30 टक्के जागा आरक्षित आहेत.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Military Bharti Training 2023-24

  • आधार कार्ड 
  • जातीचे प्रमाणपत्र 
  • रहिवासी दाखला 
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र 
  • विद्यार्थी बारावी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा बारावी उत्तीर्ण केलेला असावा
  •  पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश (आधार कार्ड लिंक असावा) 
  • अनाथ असल्यास दाखला.
फ्री MPSC ट्रेनिंग साठी अर्ज सुरु अर्ज करा 

अर्ज कुठे करावा Military Bharti Training 2023-24

  • अर्ज करण्यासाठी खालील ठिकाणी क्लिक करून नोंदणी करावे


  • अर्जासोबत तपशिलात नमूद सर्व कागदपत्रे व साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे.

महत्वाच्या अटी व शर्ती Military Bharti Training 2023-24

  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक 28 मे 2023 राहील.
  • पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • विद्यार्थ्यास पूर्ण लाभ घेण्यासाठी किमान 75 टक्के उपस्थिती असावी लागेल.
  •  अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहावी.


अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने