'आरटीई' प्रवेश झाल्याची खात्री पालकांनाही करता येणार; अशी करा खात्री!! RTE Online Admission Status

RTE Online Admission Status: 'आरटीई' नुसार राज्यामध्ये 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. यावर्षी 94 हजार 700 बालकांना इयत्ता पाहिलीमध्ये मोफत प्रवेश दिला जात आहे. RTE Free Admission साठी 13 एप्रिल पासून निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्यांदा ही मुदत 25 एप्रिल 2023पर्यंत देण्यात आली होती. परंतु तांत्रिक कारणामुळे पालकांना येणाऱ्या अडचणीमुळे ही तारीख 08 मे 2023 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. 

RTE Online Admission Status
RTE Online Admission Status

'आरटीई' प्रवेश झाल्याची खात्री पालकांनाही करता येणार; अशी करा खात्री!! RTE Online Admission Status

RTE Online Admission साठी शेवटचे काही दिवस उरले असतानाही  राज्यामध्ये अजूनही  50% प्रवेश पूर्ण झाले नसल्याचे दिसून आले आहे. यासाठी पालकांनी आपल्या बालकाचे प्रवेश झाले किवा नाही हे लक्षात येत नाही. त्यामुळे 'आरटीई' प्रवेश झाल्याची खात्री पालकांनाही करता येणार आहे. त्यासाठी खालील टप्पे पहा.

RTE Online Admission Status

  • पहिल्यांदा पालकांनी  RTE Online Admission च्या खालील वेबसाईटवर क्लिक करावे.
  • त्यांतर आलेल्या पेजवर खालील चित्रामध्ये दाखविल्यानुसार  अर्जाची स्थिती यावर क्लिक करावे 

RTE Online Admission Status

  • आपला अर्जाचा क्रमांक लिहून GO बटन वर क्लिक करावे.

यानंतर आपल्याला आपले प्रवेश निश्चित झाले किंवा नाही हे पाहता येईल. जर आपला प्रवेश निश्चित झाला असेल तर Admission Status ठिकाणी ADMITTED असे येईल. त्यापुढे प्रवेश निश्चित केल्याची दिनांक येईल. त्यावरून आपल्याला खात्री करता येईल.

पालकांसाठी महत्वाच्या सूचना 

  • निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत 13 एप्रिल 2023 पासून 08 मे 2023 पर्यंत आहे.
  • ऍडमिट कार्ड काढण्यासाठी पालकांनी लॉगिन करू नये पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती या टॅबचाच वापर करावा.
  • अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.
  • प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.
  • निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.


अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने