SCERT PAT 3 Training: संकलित मूल्यमापन 2 चाचणी (PAT 3) चे गुण चाटबॉट वर भरण्यासाठी

SCERT PAT 3 Training: संकलित मूल्यमापन 2 चाचणी (PAT 3) चे गुण चाटबॉट वर भरण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत (विद्या समीक्षा केंद्र) (VSK) लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे, सदर गुण कशा पद्धतीने भरायचे याबाबत यूट्यूब वर प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.सदर यु-ट्यूब लाईव्ह प्रशिक्षणाची लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी राज्यातील इयत्ता तिसरी ते आठवी  वर्गाला अध्यापन करणाऱ्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळेतील सर्व शिक्षकांनी यू ट्यूब लिंकला  दि 15  एप्रिल 2024  रोजी दुपारी 12: 00 वाजता  खालील लिंकवरुण जॉइन करावे. 

PAT 3 SCERT YouTube  Webinar
PAT 3 SCERT YouTube  Webinar

SCERT PAT 3 Training: संकलित मूल्यमापन 2 चाचणी (PAT 3) चे गुण चाटबॉट वर भरण्यासाठी 

प्रशिक्षणाला जॉइन होण्यासाठी क्लिक करा 

SCERT PAT 3 Training लिंक 

   https://www.youtube.com/live/xnnTpdMylxY?si=fD8JI2Fm90XjGmGd


SCERT मधील विद्या समीक्षा  (VSK), केंद्रामार्फत  PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन - 2  (PAT-3 ) गुण  भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यावर संकलित मूल्यमापन - 2 (PAT-3 )चे गुण शिक्षकांनी गुण नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन - 2 (PAT-3)चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याबाबत यु-ट्युबद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.

आपण आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शाळेतील शिक्षकांना हे प्रशिक्षण घेणे बाबत आदेशित करावे. व आपण ही स्वतः ऑनलाईन जॉईन व्हावे. आशा सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक(सर्व), उपसंचालक, प्रादेशिक विद्याप्रधिकरण (सर्व),  प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),  शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) सर्व, शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर/ दक्षिण/ पश्चिम, प्रशासन अधिकारी (म.न. पा., न. पा.,न. प.),सर्व यांना संचालक मा. शरद गोसावी साहेब , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी दिल्या आहेत. 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने