RCI Proficiency Test: आर.सी.आय.चे हे कोर्स केलेल्या उमेदवारांना द्यावी लागणार प्रवीणता चाचणी

 RCI Proficiency Test: आपण जर RCI Registered असाल आणि पुनर्वसन क्षेत्रात काम करत असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. कारण RCI च्या वतीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार खालील विशिष्ट कोर्स केलेल्या लोकांना प्रोफिसियन्सी टेस्ट द्यावी लागणार आहे. ही चाचणी पास झाल्यानंतर RCI New Delhi च्या वतीने प्रमाणपत्र दिले जाणार आहे. RCI Proficiency Test विषयी सविस्तर पाहूया.

जॉईन करा
RCI Proficiency Tes
RCI Proficiency Test

RCI Proficiency Test: आर.सी.आय. चे हे कोर्स केलेल्या उमेदवारांना द्यावी लागणार प्रवीणता चाचणी

Rehabilitation Council Of India अर्थात भारतीय पुनर्वास परिषदेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या प्रवीणता चाचणी बाबत सविस्तर असे की जय उमेदवाराने सन 2004-05 ते 2014-15 या कालावधीत बेंगलोर विद्यापीठाच्या RCI च्या मान्यताप्राप्त अभ्यास केंद्रांमधून PGDCBR, DCBR आणि Add On Course केलेल्या सर्व उमेदवारांनी कौन्सिलद्वारे आयोजित केलेल्या प्रवीणता चाचणी अनिवार्यपणे उपस्थित राहणे आवश्यक आहे. ही दुसऱ्यान्दा आयोजित करण्यात आली आहे. उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

कोणासाठी आहे RCI Proficiency Test 

  • DVR, ECSE, DHLS नंतर CBR, PGDCBR, DCBR आणि Add On Course केलेल्या उमेदवार साठी आयोजित करण्यात आली आहे.

RCI Proficiency टेस्ट विषयी सविस्तर माहिती

तपशील महत्वाच्या तारखा
फॉर्म भरण्याची शेवट 15 एप्रिल 2024
प्रवेशपत्र 30 एप्रिल 2024
परीक्षा दिनांक 11 मे 2024
परीक्षा निकाल 30 मे 2024
प्रमाणपत्र वितरण 1 ते 10 जून 24
परीक्षा फिस 500 रुपये
अर्ज करणे  ऑनलाइन
परीक्षा कालावधी 2 तास
परीक्षा वेळ 12:00 ते 02:00 Pm
उतीर्ण गुण किमान 33%
परीक्षा माध्यम हिन्दी, इंग्रजी, प्रादेशिक भाषा
परीक्षा स्वरूप MCQ, Fill in the Blanks, Short Answer, Long Answers
परीक्षा केंद्र राज्य निहाय
अधिकृत वेबसाइट https://rehabcouncil.nic.in/
ऑनलाइन फॉर्म  https://rciregistration.nic.in/rehabcouncil/advindex_4.jsp

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र 

  • स्कॅन केलेली सही 
  • स्कॅन केलेली रंगीत पासफोटो 
  • बेंगलोर विद्यापीठ गुणपत्रक 
  • CRR No
  • आधार क्रमांक 
  • दिव्यांग असल्यास UDID

शुल्क भरणे 

शुल्क भरणे प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. आपणास डेबिट कार्ड,  क्रेडिट कार्ड, यूपीआय द्वारा भरता येईल.  जर शुल्क भताना अडचण आल्यास आपण पुनः भरता येइल. फॉर्म भरून पूर्ण झालयानंतर प्रिंट अवश्य घ्यावी. 




Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने