एन.एम.एम.एस परीक्षा २०२३-२४ शिष्यवृत्तीसाठीची निवड यादी जाहीर; इथे पहा यादी | NMMS 2023-24 Selection List

NMMS 2023-24 Selection List: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2023-24 साठीची निवड यादी परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी पालक शिक्षक व शाळांना खालील दिलेल्या लिंकवरून NMMS 2023-24 Selection List पाहता  येणार आहे.

जॉईन करा

NMMS 2023-24 Selection List
NMMS 2023-24 Selection List

एन.एम.एम.एस परीक्षा २०२३-२४ शिष्यवृत्तीसाठीची निवड यादी जाहीर; इथे पहा यादी | NMMS 2023-24 Selection List 

चालू शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता आठवीसाठी NMMS Exam दिनांक 24 डिसेंबर, 2023 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची यादी दिनांक 07 फेब्रुवारी 2024 रोजी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती.

NMMS 2023-24 Selection List

आता NMMS EXAM 2023-24 मधून शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम निवडयादी शुक्रवार, दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी खालील लिंकवर जाहीर करण्यात आली आहे.

NMMS निवड 👇यादी पहा

https://www.nmms2024.nmmsmsce.in/SelectionList.aspx

महत्वाची सूचना

  • सदर परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करुन दिली जाते. संकेतस्थळावरुनच काढून घ्यावयाचा आहे.

NMMS परीक्षा उद्देश

NMMS ही शिष्यवृत्ती योजना 2007- 08 पासून केंद्र शासनाच्या मानव संसाधन मंत्रालय नवी दिल्ली या  विभागाकडून सुरु करण्यात आली आहे. देशातील आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे, तसेच त्या विद्यार्थ्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे.

NMMS Scholarship किती वर्षपर्यंत मिळते 

  • महाराष्ट्र राज्यामध्ये सदर शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत घेतली जाते. या परीक्षेमध्ये निवड झाल्यानंतर इयत्ता नववी ते बारावी पर्यंत (चार वर्षांसाठी) शिष्यवृत्ती मिळते. 

NMMS शिष्यवृत्ती किती मिळते?

  • सद्य स्थितीमध्ये सन 2017 -18 पासून दरमहा रु.1000/- निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिले जाते (वार्षिक रु.12,000/-).
  •  राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) प्राप्त गुणांची यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना / पालकांना शाळेमार्फत जात, दिव्यांगत्व, जन्म दिनांक इ. बाबतची दुरुस्ती असल्यास परीक्षा परिषदकडून ऑनलाईन पाठविणेबाबत सूचना देण्यात येतात. विद्यार्थ्यांनी पालकांनी शाळेमार्फत पाठविलेल्या दुरुस्त्यांचा विचार करुन नंतरच शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी जाहीर केली जाते.
  • दिनांक 24 डिसेंबर, 2023 रोजी घेण्यात आलेल्या NMMS परीक्षसाठी 02 लाख 66 हजार 352 विद्यार्थी नोंदविण्यात आले होते. 

NMMS Student Quota 

  • NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी 11 हजार 682 शिष्यवृत्ती कोटा शिक्षण मंत्रालय (MoE), नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केलेला आहे.

NMMS शिष्यवृत्ती दिव्यांग विद्यार्थीना मिळते? 

  • महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठी 04% आरक्षण समाविष्ट आहे. 
  • सर्व जिल्हयांसाठी स्वतंत्रपणे सातवी व आठवीची विद्यार्थी संख्या व 12 ते 14 वर्ष वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हयानिहाय कोटा निश्चित करण्यात येतो. 
  • सदरची निवडयादी व गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.inhttps://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर  पाहता येईल.

NMMS शिष्यवृत्ती कोणामार्फत वितरित केली जाते? 

  • शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांचेमार्फत केले जाते.

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने