आरटीई ऑनलाइन फॉर्म या तारखेनंतर सुरू होणार : RTE Admission maharashtra.gov. in form

RTE Admission Maharashtra gov in form: महाराष्ट्र शासनाने RTE Act 2009 मध्ये बदल केल्यानंतर एक महिन्याने आरटीई पोर्टलवर शाळांची नोंदणी करणे आणि रिक्त जागा अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. मार्च महिन्यात आरटीई पोर्टलवर शाळांची नोंदणी करणेसाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. पालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यास सुरुवात करण्याऐवजी शाळा नोंदणीस पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. 

जॉईन करा

RTE Admission maharashtra.gov. in form
RTE Admission maharashtra.gov. in form


आरटीई ऑनलाइन फॉर्म या तारखेनंतर सुरू होणार : RTE Admission maharashtra.gov. in form

आरटीई पोर्टलवर 8 एप्रिल रोजी 75 हजार 960  शाळांची नोंदणी झाली असून, आतापर्यंत  9 लाख 72 हजार 757 रिक्त जागा अपडेट करण्यात आल्या आहेत. 

मागील अनेक दिवसांपासून आरटीई पोर्टलवर शाळा तसेच आरटीईअंतर्गत 25 टक्के रिक्त असलेली विद्यार्थी संख्या यात फारसा बदल झाला असल्याचे दिसून आले नाही, तरीही राज्य शासनाच्या वतीने  पुन्हा एकदा  12 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

तपशील माहिती
RTE वेबसाइट https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new
पालकांना फॉर्म भरण्याची लिंक https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login
एकूण पात्र शाळा 75 हजार 960
प्रवेश रिक्त जागा 9 लाख 72 हजार 757
ऑनलाइन फॉर्म 15 एप्रिल नंतर शक्यता

आरटीई ऑनलाइन फॉर्म या तारखेनंतर सुरू होणार

खरे पाहता आता आरटीई पोर्टलवर शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून रिक्त जागांवर प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यास सुरुवात करणे गरजेचे आहे. कारण दरवर्षी पेक्षा या वर्षी RTE Online  Admission Process ला उशीर झाला आहे.  परंतु शासनाने शाळा नोंदणी प्रक्रियेस 12 एप्रिल 2024  मुदतवाढ दिल्यामुळे आरटीई ऑनलाइन फॉर्म या तारखेनंतर सुरू होणार आहेत. 

यावर्षी रिक्त जागांचा आकडा दहा लाखांपर्यंत जाणार 

  • फेब्रुवारी महिन्यात आरटीई कायद्यात बदल केला. त्यानंतर एक महिन्याने महणजेच 04 मार्च रोजी पोर्टलवर शाळा नोंदणीस सुरुवात केली. शासकीय आणि अनुदानित शाळांना पोर्टलवर नोंदणीला संधी दिली आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत रिक्त जागांचा आकडा आतापर्यंत  9 लाख 72 हजार 757 पर्यन्त गेला आहे. 

  • शासनाकडून शाळा नोंदणीस मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राज्य शासन आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी वेळकाढूपणा करीत आहे. तसेच, आरटीई कायद्याची प्रभावी अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.

RTE प्रवेशासाठीच्या शाळा 

अनुशाळा व्यवस्थापन
1महानगरपालिका शाळा (Municipal Corporation)
2नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत शाळा
3कंटोमेंट बोर्ड शाळा
4जिल्हा परिषद शाळा
5महानगरपालिका शाळा (स्वयं अर्थसहाय्यीत शाळा)
6जिल्हा परिषद (माजी शासकीय शाळा)
7खाजगी अनुदानित शाळा
8स्वयंअर्थसहाय्यीत शाळा Self Finance school
9पोलीस कल्याणकारी शाळा


Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने