RTE Admission 2024-25 Age: नवीन शैक्षणिक वर्षात आरटीई २५ टक्के प्रवेशाचे वय निश्चीत; आपल्या मुलांचे वय चेक करा

RTE Admission 2024-25: आरटीई 25 टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया आता गती घेत आहे. शासनाकडून RTE 25% Admission पात्र शाळांना RTE Portal वर नोंदणी करण्यासाठी कळविले आहे. जसजशी ही प्रक्रिया पुढे जात आहे तसतशी पालकांना RTE Admission Age Rule विषयी उत्सुकता लागली आहे. अशातच शासनाने फेब्रुवारी 2024 दरम्यान परिपत्रक जारी करून शाळा प्रवेशासाठी बालकाचे वयाबाबत निश्चित केले आहे. इथे RTE Admission 2024-25 Age चे परिपत्रक आणि संपूर्ण  माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

जॉईन करा

RTE Admission 2024-25 Age
RTE Admission 2024-25 Age

RTE Admission 2024-25 Age:  नवीन शैक्षणिक वर्षात आरटीई २५ टक्के प्रवेशाचे वय निश्चीत; आपल्या मुलांचे वय चेक करा

आपणास माहीत आहे की, RTE 25% Admission 2023-24 मध्ये बालकाचे वय 01 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 या दरम्यानचे गृहीत धरण्यात आले होते.

फार्म लिंक https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login

शासन निर्णय 18 सप्टेंबर 2020 नुसार शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शाळा प्रवेशासाठी मानीव दिनांक 31 डिसेंबर ही ठेवण्यात आली आहे. त्यानुसार शासनाने बालकांच्या शाळा प्रवेशासाठी किमान वय निश्चित केले आहे. परंतु कमाल वयाबाबत कोणतीही मर्यादा ठरवून दिली नाही.

 RTE Admission 2024-25 Age

विद्यार्थ्यांचे नुकसान मानिव दिनांकामुळे होऊ नये म्हणून शासनाच्या वतीने RTE Admission 2024 - 25  साठी वयोमर्यादा 31 डिसेंबर 2024 अखेर पुढीलप्रमाणे करून दिली आहे.

RTE Play Group/ Nursery

  • या वर्गासाठी बालकांचा जन्म 01 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान झालेला असावा. RTE 25% अंतर्गत प्रवेश करण्यासाठी  31 डिसेंम्बर 2024 रोजी बालकांचे किमान वय 3 वर्षे किंवा 4 वर्षे 5 महिने 30 दिवस या कमाल मर्यादेत असावे.

RTE Junior KG

  • या वर्गासाठी बालकांचा जन्म 01 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान झालेला असावा. RTE 25% अंतर्गत प्रवेश करण्यासाठी  31 डिसेंम्बर 2024 रोजी बालकांचे किमान वय 4 वर्षे किंवा 5 वर्षे 5 महिने 30 दिवस या कमाल मर्यादेत असावे.

RTE Senior KG

  • या वर्गासाठी बालकांचा जन्म 01 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 दरम्यान झालेला असावा. RTE 25% अंतर्गत प्रवेश करण्यासाठी  31 डिसेंम्बर 2024 रोजी बालकांचे किमान वय 5 वर्षे किंवा 6 वर्षे 5 महिने 30 दिवस या कमाल मर्यादेत असावे.

RTE Admission 2024-25 Age
 RTE Admission 2024-25 Age

RTE First Class

  • या वर्गासाठी बालकांचा जन्म 01 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 दरम्यान झालेला असावा. RTE 25% अंतर्गत प्रवेश करण्यासाठी  31 डिसेंम्बर 2024 रोजी बालकांचे किमान वय 6 वर्षे किंवा 7 वर्षे 5 महिने 30 दिवस या कमाल मर्यादेत असावे.

परिपत्रक पहा RTE Admission Age rule Letter

RTE Admission Age rule Letter
RTE Admission Age rule Letter

 RTE Admission 2024-25 Age

नुकतेच केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने RTE ACT 2009 चा आधार घेऊन RTE Admission 2024-25 या वर्षात वयाबाबत  खालील परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

म्हणजे आता पालकांना आपल्या पाल्याचे वय इयत्ता पहिलीसाठी किमान 6 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. वर दिल्या प्रमाणे इयत्ता पहिली वर्गासाठी बालकांचा जन्म 01 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 दरम्यान झालेला असावा.


Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने