फ्री प्रशिक्षण !!! 'युविका' कार्यक्रम जाहीर ISRO - YUVIKA Programme 2023 | ऑनलाईन अर्ज भरा

बाल वैज्ञानिकांसाठी इस्रो वारी ISRO - YUVIKA Programme 2023 नववीच्या विद्यार्थ्यांसाठी युविका विज्ञान शिबिर मध्ये सहभागी होण्यासाठी सुवर्ण संधी 

YUVIKA Programme 2023

तुमचा पाल्य जर इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असेल तर त्याला भारतीय अवकाश संशोधन संस्था [Indian Space Research Organisation] म्हणजेच इस्रोच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळू शकते. बाल वैज्ञानिक शास्त्रज्ञांसाठीचा युविका म्हणजे YUVIKA - YUva VIgyani KAryakram (Young Scientist Programme) युवा विज्ञानी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. हे शिबिर 15 ते 26 मे दरम्यान इस्रोच्या केंद्रावर हा कार्यक्रम पार पडेल.

YUVIKA PROGRAMME 2023
YUVIKA PROGRAMME 2023

बाल वैज्ञानिकांसाठी इस्रो वारी | ISRO - YUVIKA Programme 2023

इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे निवड प्रक्रियेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 15 टक्के अधिक गुण मिळणार असून त्याचा थेट फायदा ZP SCHOOL मधील विद्यार्थ्यांना होणार आहे. गुणवत्ता यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या जाण्या-येण्याचा आणि राहण्याचा खर्च इस्रोच्या वतीने करण्यात येणार आहे

हे ही वाचा 

शिबिराचे ठिकाण

इस्रोचे हे शिबिर खालील इस्रोच्या सात ठिकाणी पार पडणार आहे. त्यामध्ये

अनु इस्रो केंद्र नाव ठिकाण
1 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग डेहराडून
2 विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुअनंतपुरम
3 सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरीकोटा
4 यु आर राव सॅटेलाईट सेंटर बेंगलुरू
5 स्पेस एप्लीकेशन सेंटर अहमदाबाद
6 नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर हैदराबाद
7 नॉर्थ ईस्ट स्पेसअँप्लिकेशन सेंटर शिलॉंग

ISRO YUVIKA 2023
ISRO YUVIKA 2023

महत्त्वाच्या तारखा 

सदरील YUVIKA Programme 2023 साठी अर्ज भरण्यास सुरुवात 20 मार्चपासून  होणार आहे.  दिलेल्या कार्यक्रम पत्रिके नुसार दोन निवडयादी जाहीर होणार आहेत. YUVIKA Programme  निवड प्रक्रिया एप्रिल 2023 मध्ये पूर्ण होणार आहे. 

युविका कार्यक्रम वेळापत्रक

अनु तपशील दिनांक
1 अर्ज भरण्यास सुरुवात 20 मार्च 2023
2 अर्ज भरण्याचा शेवटचा 03 एप्रिल 2023
3 पहिली निवड यादी 10 एप्रिल 2023
4 दुसरी निवड यादी 20 एप्रिल 2023
5 विद्यार्थी इस्रोच्या विविध केंद्रावर हजर होतील 14 मे 2023
6 युविका विज्ञान कार्यक्रम 15 ते 26 मे 2023

संपूर्ण माहिती वाचा 

निवडीसाठी गुणदान पद्धती

  • इयत्ता आठवीतील किंवा शेवटच्या परीक्षेतील गुण  : 50%
  • ऑनलाइन क्वीजमधील कामगिरी : 10%
  • विज्ञान प्रदर्शनात सहभाग  : 17 %
  • ओलंपियाड स्पर्धेचे रँक : 11%
  • क्रीडा स्पर्धांचे विजेते : 11 %
  • स्काऊट आणि गाईड /एनसीसी /एनएसएस : 5%
  • ग्रामपंचायतच्या अखत्यारीत्यातील जिल्हा परिषद किंवा इतर शाळेतील विद्यार्थी 15%

अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्ज


  • SPCE QUIZ सोडवा!!!
  • नववीच्या विद्यार्थ्यांना इस्रो मध्ये प्रशिक्षणाची सुवर्ण संधी
  • प्रथम नोंदणी करा. नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
  • खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
  • यावर दिलेली सर्व माहिती वाचा.
  • पेज च्या शेवटी 
  • Flyer आणि Apply for YUVIKA Registration असेल.
  • त्यातील Apply for YUVIKA Registration  वर क्लिक करा.
  • पुढील टप्पे पूर्ण करा.

  • QUIZ बाबत खालील माहिती वाचा



असा भरा फॉर्म

पात्रता 

देशातील  01 जानेवारी 2023 रोजी इयत्ता 9वी मध्ये शिकणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.

अर्ज करा. 

  1. महाज्योती द्वारा आयोजित फ्री MPSC क्लासेस करिता ऑनलाईन अर्ज
  2. महाज्योती द्वारा आयोजित फ्री UPSC (इंग्रजी माध्यम) फॉर्म भरण्यासाठी इथे क्लिक करा
  3. महाज्योती द्वारा आयोजित फ्री UPSC (मराठी माध्यम) फॉर्म भरण्यासाठी इथे क्लिक करा

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा  

 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने