शिक्षक भरती पवित्र पोर्टल सर्वसाधारण शिफारस याद्या जाहीर यादीमध्ये नाव पहा tait2022.mahateacherrecruitment.org.in

tait2022.mahateacherrecruitment.org.in : शिक्षक अभियोग्यता व बु‌द्धिमता चाचणी-२०२२ नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीबाबत.

tait2022.mahateacherrecruitment.org.in
tait2022.mahateacherrecruitment.org.in 


शिक्षक भरती पवित्र पोर्टल सर्वसाधारण शिफारस याद्या जाहीर यादीमध्ये नाव पहा tait2022.mahateacherrecruitment.org.in 

  • पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पहिल्या टप्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची  सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  • निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व अभियोग्यताधारकांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक
  • अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास सर्वांना शुभेच्छा.




***********
Old Update pavitra apdate

https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता व बु‌द्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्राप्त प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवारांकडून दिनांक ०५/०२/२०२४ ते १४/०२/२०२४ या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत.

त्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारांतर्गत त्यांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे.

मुलाखतीसह या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम, आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाचा गट, विषय तसेच विविध न्यायनिवाडे, शासन आदेश इत्यादी सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झाली आहे.

ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत, त्यांना लॉगीन केल्यानंतर अॅप्लिकेशन फॉर्म (Application Form) मेनू अंतर्गत अॅप्लिकेन्ट रिकमंडेड स्टेटस (Applicant Recommended status) यावर क्लिक केल्यावर सलेक्ट राऊंड (Select Round) या ड्रॉपडाऊन (Dropdown) मधून फेज-१ (Phase-1) यानंतर सलेक्ट इंटरव्हिव टाईप (Select Inteview Type) या ड्रॉपडाऊन (Dropdown) मधून विदाआऊट इंटरव्हिव (without Interview) मेनू निवडावा. त्यानंतर सबमिट (submit) वर क्लिक करावे

त्यानंतर व्हिव रिकमंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट (View Recommended Institute list) या मध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्यास, सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल. व्हिव प्रेफरेन्स वाईस स्टेटस (View Preferencewise status) यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम हिरव्या रंगामध्ये दिसेल.

नियुक्ती प्राधिकारी/व्यवस्थापन यांनादेखील स्वतंत्रपणे पुढील कार्यवाहीबाबत सूचना देण्यात येत आहेत.

निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच उमेदवारांच्या पात्रतेसंबंधीच्या कागदपत्रांची निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढल्यास उमेदवारांची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल तसेच अशा उमेदवारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

उमेदवारांच्या निवडीबाबत उमेदवारांच्या काही अडचणी असल्यास राज्यस्तरावर "तक्रार निवारण व दुरुस्ती समिती" स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी आपणास edupavitra२०२२@gmail.com या ईमेल वर सबळ पुराव्यांसहित अर्ज सादर करता येईल.

उमेदवारांना अन्य काही अडचणी आल्यास edupavitra2022@gmail.com या email वर संपर्क साधता येईल.

ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जात असताना अनेक असंतुष्ट घटक काहीतरी वावड्या उडवून प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते. परंतु ते सर्व प्रयत्न सनदशीर मार्गाने व ठामपणे प्रशासनाने हाणून पाडले आहेत

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने