मोठा निर्णय!! महसुली अधिकारी सांभाळणार शिक्षण खाते प्रतिनियुक्तीचा शासन निर्णय जारी Education Department GR

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अखत्यारीतील शिक्षण सहसंचालक पदावर प्रतिनियुक्तीने पदस्थापना देण्याबाबत  शासन निर्णय 04 मे 2023 रोजी जारी करण्यात आला आहे.

Education Department GR
Education Department GR

मोठा निर्णय!!  महसुली अधिकारी सांभाळणार शिक्षण खाते प्रतिनियुक्तीचा शासन निर्णय जारी Education Department GR

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या क्षेत्रीय आस्थापनेवरील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ (प्रशासन शाखा) मधील शिक्षण सहसंचालक पदावर प्रथमतः एक वर्षासाठी व सदर पदावर नियमित अधिकारी नियुक्त होईपर्यंत खालील नमूद कर्मचाऱ्यांची त्यांच्या नावासमोर नमूद पदावर अटी व शर्तीच्या अधिन राहून शालेय शिक्षण विभागाकडून प्रतिनियुक्ती करण्यात आली असल्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Education Department GR

शासन निर्णयानुसार प्रतिनियुक्त केलेल्या अधिकारी यांचा तपशील.

नाव व पदनाम प्रतिनियुक्तीने नियुक्ती दिलेले पद
श्री दिलीप ज्ञानदेव जगदाळे, अप्पर जिल्हाधिकारी सहसंचालक शिक्षण आयुक्तालय, पुणे
डॉ श्रीनिवास पुंडलिकराव कोतवाल उपसचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग सह आयुक्त (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक
श्री विजय कृष्णाजी पोवार (दिव्यांग), विशेष कार्याधिकारी कार्यकारी, अध्यक्ष राज्य नियोजन मंडळ, मुंबई विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभाग, नाशिक
श्रीम. मंजुषा मिसकर, अपर जिल्हाधिकारी विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
डॉ उदय आप्पासाहेब पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / प्रकल्प संचालक विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर
श्री संतोष अशोक हराळे, सहा. आयुक्त (चौकशी), विभागीय आयुक्त कार्यालय पुणे शिक्षण सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे
श्री कमलाकर रणदिवे ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प भंडारा आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
श्री प्रशांत शिर्के, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गडचिरोली शिक्षण सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे
श्री सुरज रोहिदास वाघमारे, अप्पर जिल्हाधिकारी, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, विभागीय मंडळ, अमरावती

अधिक माहितीसाठी 

इतर माहितीसाठी इथे क्लिक करा 

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 



Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने