CBSE Exam Result 2023 : दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार; या ठिकाणी पाहा निकाल

CBSE Board 10th-12th Result 2023 : गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) एकाच दिवशी, काही तासांच्या कालावधीत 10 वी आणि 12 वीचे निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. या निकालाची प्रतीक्षा तब्बल 39 लाखच्या जवळपास विद्यार्थी करत आहेत.

परीक्षेसाठी उपस्थित विद्यार्थी संख्या 

अनु क्र इयत्ता विद्यार्थी संख्या
01 दहावी 21,86,940
02 बारावी 16,96,770
03 एकूण 38,83,710

CBSE Exam Result 2023
CBSE Exam Result 2023

CBSE Exam Result 2023 : दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार; या ठिकाणी पाहा निकाल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी (CBSE 10th Exams) आणि बारावीच्या परीक्षा (CBSE 12th Exams) संपून बराच काळ झाला आहे. आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. 10वी आणि 12वी बोर्डाचा निकाल जाहीर होण्यापूर्वी तुम्ही हा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहाल, तसेच निकाल कोणत्या दिवशी पाहता येईल या संबंधित अधिक माहिती जाणून घ्या. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) एकाच दिवशी, काही तासांच्या कालावधीत 10 वी आणि 12 वीचे निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.

CBSE Exam Result 2023 : निकाल कधी जाहीर होणार? सीबीएसईने अधिकृत वेबसाईटवर निकालाची तारीख आणि वेळ सध्या जाहीर केलेली नाही. परंतु सीबीएसईच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत या परीक्षांचे निकाल जाहीर होतील

सोशल मीडियावरुन जाहीर होणार CBSE Exam Result 2023

परीक्षेचा निकाल जाहीर करण्याच्या तारखा CBSE द्वारे त्यांच्या अधिकृत वेबसाईट, ट्विटर हँडल आणि इतर सोशल मीडियावरुन जाहीर केल्या जातील. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर निकाल तपासण्याची पद्धत वेगळी आहे. विद्यार्थ्यांनी या संदर्भात अधिक तपशीलवार माहिती मिळाल्यानंतरच निकाल तपासा. तसेच, निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र ओळखपत्र यांसारख्या तपशीलाची नोंद करावी लागेल. 

या वेबसाईट्सवर निकाल पहा CBSE Exam Result 2023

सीबीएसई बोर्ड 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खलील वेबसाईट्सवर तपासता येतील.

cbse.gov.in 

cbseresuts.nic.in 

निकाल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र ओळखपत्र आवश्यक असेल. याशिवाय इतर कोणत्याही माहितीसाठी विद्यार्थी अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात. 

कधी  झाल्या परीक्षा? CBSE Exam

सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 14 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या. त्यानुसार, दहावीच्या परीक्षा या 21 मार्चला संपल्या तर बारावीच्या परीक्षा 5 एप्रिलला संपल्या. या परीक्षा होऊन एक महिना उलटून गेला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. 

वेबसाईट तपासत रहा CBSE Exam Result 2023

दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. या संदर्भात नवीन आणि अपडेटेड माहिती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी अधिकृत वेबसाईट तपासावी लागेल. जेणेकरून उमेदवारांना नवीन अपडेट्स मिळतील.

इतर माहितीसाठी इथे क्लिक करा 

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने