Big NEWS: जुनी पेन्शन योजना बैठकीची तारीख ठरली; समन्वय समितीला निमंत्रण Old Pension Scheme Meeting

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना अर्थात Old Pension Scheme (OPS)National Pension System (NPS) याचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने गठीत समिती बरोबर चर्चेसाठी उपस्थित राहण्याबाबत सरकारी निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी, समन्वय समितीच्या सरचिटणीस श्री विश्वास काटकर याना उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.


Old Pension Scheme MEETING
Old Pension Scheme MEETING 

Big NEWS: जुनी पेन्शन योजना बैठकीची तारीख ठरली; समन्वय समितीला निमंत्रण Old Pension Scheme Meeting

संबंधित पत्रानुसार Old Pension Scheme (OPS) व National Pension System (NPS) याचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार दिनांक 14 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार समिती गठित करण्यात आली आहे. सदर समिती दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतरच्या नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर व आर्थिक सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाय योजनेबाबत शिफारस / अहवाल शासनात सादर करावयाचा आहे.

01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी 21 एप्रिल 2023 रोजी संघटनेचे सरचिटणीस आणि समितीच्या सदस्यासमवेत  बैठक पार पडली होती.

Old Pension Scheme Meeting Letter
Old Pension Scheme Meeting Letter

Old Pension Scheme Meeting

सदर बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार या संबंधाने अधिकची माहिती सरकारी निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, कर्मचारी समन्वय समितीस द्यायची असल्यामुळे पुन्हा या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले आहे.

Old Pension Scheme Meeting Venue

यासाठीची बैठक 9 मे 2023 रोजी 6:00 वाजता मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या सातव्या मजल्यावरील कक्ष क्रमांक 05 मध्ये आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आता या जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन योजनाच्या तुलनात्मक अभ्यासाच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

इतर माहितीसाठी इथे क्लिक करा 

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 

1 टिप्पण्या

Please do not entre any spam link in the comment box.

  1. निवृत्ती चे वय वर्षे 60 केंद्र सरकार व इतर 25 राज्यांत गेल्या अनेक वर्षांपासून आमलात असताना महाराष्ट्रातील कर्मचार्यांसाठी लागू झालेला नाही ही बाब राज्यातील आलटून पालटून सत्ता भोग घेणार्या सर्व पक्षीय राजकारण्यांसाठी शरमेची आहे. ता 8 वा वेतन आयोग लागू होण्याची वेळ आलेली असताना सुद्धा कर्मचार्यांना मुर्ख समजून उल्लू बनवले आहे याची सर्वांना माहित आहे.

    उत्तर द्याहटवा
टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने