शिक्षकांच्या बदल्या थांबणार? शासन स्तरावर धोरणात्मक निर्णयासाठी विचार सुरु - केसरकर School Teacher Transfer

शिक्षकांच्या बदल्या हे जिव्हाळ्याचा विषय असून School Teacher Transfer याविषयी शालेय शिक्षण मंत्री Deepak Kesarkar यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले कि शिक्षकांवरील बोजा कमी व्हावा, शिक्षक एकाच जागी थांबून मुलांना चांगल्या रीतीने शिक्षण देतील अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. परंतु शिक्षक संघटनांचा यास विरोध दिसून येतो आहे.

School Teacher Transfer
School Teacher Transfer


शिक्षकांच्या बदल्या थांबणार? शासन स्तरावर धोरणात्मक निर्णयासाठी विचार सुरु - केसरकर School Teacher Transfer

राज्यात भविष्यात School Teacher Transfer न करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. मात्र निर्णय होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे शिक्षकांच्या बदल्या थांबवल्या गेलेल्या नाहीत असेही ते म्हणाले. शिवाय या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी आणि कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाईल, कॅबिनेटच्या संमतीने या संदर्भातला पुढचा निर्णय घेतला जाईल असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

शिक्षकांची बदली का नको?

  • शिक्षकांवरील बोजा कमी व्हावा.
  • शिक्षक एकाच जागी थांबून मुलांना चांगल्या रीतीने शिक्षण द्यावे.
  • यासाठी पूरक व्यवस्था निर्माण करण्यात येईल.
  • सततच्या बदल्यामुळे त्रस्त झालेल्या शिक्षकांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल.
शिक्षकांच्या बदल्या करणे योग्य आहे अथवा नाही याबाबत विचार सुरु - शिक्षणमंत्री दीपक केसरकर 

 परंतु शासनाच्या या विचारावर प्राथमिक शिक्षक संघटनेचा विरोध असल्याबाबत संघटनेच्या वतीने मत मांडले आहे.

काय म्हणाले शिक्षणमंत्री Deepak Kesarkar on School Teacher Transfer




शिक्षण मंत्री म्हणाले कि, जे शिक्षण खाते आहे आम्ही शिक्षण खाते आणि ग्रामविकास खाते मिळून काम करत असतं ज्यावेळेला आम्ही मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती करतो त्यावेळेला शिक्षकांच्या बदल्या थांबता येतील का हा विचारही आम्ही करतोय कारण माध्यमिक शाळांमध्ये एकाच शाळेमध्ये आयुष्यभर शिक्षक शिकवत असतात चांगल्या दर्जाचे विद्यार्थिनी निर्माण करत असतात फक्त गव्हर्मेंट स्कूलमध्ये बदल्या होतात त्या वेळेला बदल्या योग्य आहेत किंवा नाही यावर आम्ही विचार करत आहोत हा एक फार मोठा धोरणात्मक निर्णय होईल त्यामुळे तुम्ही एकटा घेऊ शकत नाही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संपूर्ण कॅबिनेटला विश्वासात घेऊन हा निर्णय करावा लागणार आहे..

शिक्षक संघटनेकडून विरोध 

शासनाच्या या निर्णयाला शिक्षक संघटनाचा प्रखर विरोध दिसून येतो आहे. त्यानुसार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेकडून  या निर्णयाला विरोध दर्शवण्यात आला आहे.

शिक्षकाची बदली न करणे याधोरणाला शिक्षक संघाचा विरोध आहे. या विरोधधाला शासन जर  जुमानत नसेल तर TEACHER UNION ला संविधानाने दिलेल्या घटनात्मक आंदोलनाच्या अधिकाराचा वापर करून राज्यभर रान पेटवू असा इशारा शिक्षक संघटनेचे वतीने देण्यात आले आहे.

शिक्षण विभागामध्ये होणारे नवनवे बदल पाहत असताना शिक्षक बदल्या विषयीची हि शासन स्तरावरील या चर्चेकडे शालेय शिक्षकाचे लक्ष लागून आहे.

शिक्षक संबंधित महत्वाचे वाचा 

सरकारी कर्मचार्यांना केंद्राप्रमाणे आरक्षण आणि प्रमोशन 

खुशखबर आठव्या वेतन आयोनुसार किती वाढ होईल पगारात इथे पहा 

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 


Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने