सर्वच शिक्षक, मुख्याध्यापकांना करावे लागणार आधार व्हॅलिडेशन | Udise Plus Teacher Aadhaar Validation Process

राज्यातील सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी महत्वाचे परिपत्रक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई [MPSP Mumbai] यांच्या वतीने आले आहे. या परिपत्रक नुसार सन 2022 -23 यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये सर्व शिक्षकांच्या आधार व्हॅलिडेशन करून घेणे बाबत सूचना करण्यात आले आहेत.


Udise Plus Teacher Aadhaar Validation Process
Udise Plus Teacher Aadhaar Validation Process

सर्वच शिक्षक, मुख्याध्यापकांना करावे लागणार आधार व्हॅलिडेशन | Udise Plus Teacher Aadhaar Validation Process

MPSP च्या परिपत्रकानुसार  भारत सरकार शिक्षा मंत्रालयाकडे राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची माहिती UDISE +  2022 23 मध्ये सादर करणे राज्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार यु डायस प्लस मध्ये राज्यातील सर्व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन Teacher Aadhaar Validation करण्याकरिता शाळा स्तरावर टॅब ओपन करण्यात आली आहे. 

प्राथमिक शिक्षण परिषदेच्या सहायक संचालक (कार्यक्रम) यांच्या वतीने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत तालुक्यातील सर्व शाळांना Teacher Aadhaar Validation करण्याकरिता शाळांच्या मुख्याध्यापक यांना कळविण्याबाबत सूचित केले आहे.

Teacher Aadhaar Validation
Teacher Aadhaar Validation

Teacher Aadhaar Validation करताना काही अडचणी येत असल्यास आधार कार्डवर नोंदवलेले नावाप्रमाणे यु डायस प्लस मध्ये नाव नोंदविण्यात यावे. सदरची व्हॅलिडेशन हे 30 एप्रिल 2023 या तारखेपर्यंत पूर्ण करण्याकरिता प्रणाली सुरू ठेवण्यात आली आहे.  त्यानंतर ही टॅब बंद कौ शकते. त्यामुळे Teacher Aadhaar Validation डेटा वेळेत पूर्ण करण्यात यावे.  शाळांची माहिती वेळेत पूर्ण करून न घेतल्यास याची जबाबदारी सुद्धा त्या त्या गटशिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

असे करा आधार व्हॅलिडेशन How To Valid Teacher Aadhar Data

 युडायस मध्ये आधार करण्यासाठी खाली स्टेप follow करा 
स्टेप हे करा
स्टेप 1 यु डायस प्लस https://udiseplus.gov.in/#/home या वेबसाईटवर जा
स्टेप 2 Login For All यावर क्लिक करा
स्टेप 3 त्यानंतर Teacher Module यावर क्लिक करा
स्टेप 4 शाळेचा युजरनेम पासवर्ड आणि कॅप्च्या टाकून लॉगिन करा
स्टेप 5 लॉगिन केल्यानंतर click Here To Open Teacher DCF to Fill Data यावर क्लिक करा
स्टेप 6 आपल्या शाळेच्या शिक्षक संख्येवर क्लिक करा
स्टेप 7 आधार डेटा verify दिसत असेल तर ग्रीन कलर मध्ये दिसेल
स्टेप 8 जर आधार डेटा verify नसेल तर रेड कलर मध्ये दिसेल.
स्टेप 9 त्यासोबतच verify न होण्याचे error ही दिसेल.
स्टेप 10 Error वाचून त्यानुसार शिक्षकांच्या जनरल प्रोफाइल वर क्लिकबकरा
स्टेप 11 जो error दिसून आला होता त्यावर क्लिक करून माहिती अचूक लिहा व शेवटी Update करा.
स्टेप 12 अपडेट केल्यानंतर शिक्षकांच्या जनरल प्रोफाइल वर जा आणि Verify Aadhar From UIDAI यावर क्लिक करा. आपला डेटा verify झालेला दिसेल.

आपल्याला हि माहिती आवडली असल्यास नक्की आमच्या Whatsapp Group ला जॉईन करा 

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा    

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने