MH HSC SSC FEE REFUND: दहावी-बारावी विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फिस परत मिळणार; यादीमध्ये नाव पहा

MH HSC SSC FEE REFUND: राज्य मंडळाकडून नुकत्याच दहावी-बारावीच्या परीक्षा संपन्न झाल्या आहेत.  राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील दहावी आणि बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची परिपूर्ती करण्यात येणार आहे. MH HSC SSC FEE REFUND चा फायदा दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावी विद्यार्थ्यांना होणार आहे.  राज्यातील 40 तालुक्यांची यादी खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.  

जॉईन करा
MH HSC SSC FEE REFUND
MH HSC SSC FEE REFUND

MH HSC SSC FEE REFUND: दहावी-बारावी विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फिस परत मिळणार; यादीमध्ये नाव पहा 

राज्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची FEE REFUND साठी राज्य मंडळातर्फे विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्याची माहिती ऑनलाइन मागविण्यात आली आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना ही माहिती भरण्यासाठी गुरुवार (दि. 28 मार्च 2024 ) पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.

10 वी- 12 वी विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फिस परत करणे GR

शासन निर्णय 31 ऑक्टोबर 2023 नुसार  राज्यातील दुष्काळग्रस्त आणि टंचाईग्रस्त भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती राज्य मंडळस्तरावरून करण्यात येणार आहे. शासनाने जाहीर केलेले 40 तालुके व 1 हजार 21 महसूल विभागातील बाधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

वरील 40 तालुक्याच्या  क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च 2024 साठी बसलेल्या नियमित विद्यार्थ्यांची यादी खालीलप्रमाणे पाहता येणार आहे 

 दहावीसाठी
http://feerefund.mh-ssc.ac.in

बारावीसाठी
 http://feerefund.mh-hsc.ac.in 

MH HSC SSC FEE REFUND यादीमध्ये नाव पहा 

विद्यार्थी यादी पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक केल्यानतर आलेल्या 11 सुचनाचे वाचन करून शेवटी चेक बॉक्स वर क्लिक करावे. त्यानंतर मेनू मधील Student List वर क्लिक करून सीट नबर लिहा आणि सबमीत करावे 

राज्यातील दुष्काळग्रस्त आणि टंचाईग्रस्त तालुके 

अनू जिल्हा तालुका
1 नंदुरबार नंदुरबार
2 धुळे सिंधखेडा
3 जळगाव चाळीसगांव
4 बुलढाणा बुलढाणा
5 बुलढाणा लोणार
6 जालना भोकरदन
7 जालना जालना
8 जालना बदनापुर
9 जालना अंबड
10 जालना मंठा
11 छ संभाजी नगर छ संभाजी नगर
12 छ संभाजी नगर सोयगांव
13 नाशिक मालेगाव
14 नाशिक सिन्नर
15 नाशिक येवला
16 पुणे पुरंदर सासवड
17 पुणे बारामती
18 पुणे शिरूर घोडनदी
19 पुणे दौंड
20 पुणे इंदापूर
21 लातूर रेणापूर
22 धारशिव वाशी
23 धारशिव धारशिव
24 धारशिव लोहारा
25 बीड वडवणी
26 बीड धारूर
27 बीड अंबाजोगाई
28 सोलापूर बार्शी
29 सोलापूर माळशिरस
30 सोलापूर सांगोला
31 सोलापूर करमाळा
32 सोलापूर माढा
33 सातारा वाई
34 सातारा खंडाळा
35 कोल्हापूर हातकणंगले
36 कोल्हापूर गडहिंग्लज
37 सांगली शिराळा
38 सांगली कडेगाव
39 सांगली खानापूर विटा
40 सांगली मिरज
41 एकूण 40 तालुके 

मुदतवाढ 

ऑनलाइन माहिती भरण्यास येणारी तांत्रिक अडचण लक्षात घेता 28 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती मिळण्यासाठी संबंधित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा. या संदर्भात राज्य मंडळाच्या https://mahahsscboard.in/ संकेतस्थळावर माहिती दिली आहे.

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने