NMMS Result 2024: एनएमएमएस परीक्षा निकाल जाहीर; इथे पहा निकालाची लिंक

NMMS Exam Result Link: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS Exam) इ. 8वी साठी परीक्षा दिनांक 24 डिसेंबर, 2023 रोजी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आली. या परीक्षेच्या गुणयादीबाबत मोठी अपडेट आली आहे ती म्हणजे NMMS Exam Merit List जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना NMMS Result 2024 खालील दिलेल्या लिंकवरून पाहता येणार आहे.

जॉईन करा

NMMS Result 2024
 NMMS Result 2024

NMMS Result 2024: एनएमएमएस परीक्षा निकाल जाहीर; इथे पहा निकालाची लिंक

NMMS Exam बाबत सांगावयाचे झाल्यास असे की सन 2007- 08 पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे MSCE Pune यांचे मार्फत दिनांक 24 डिसेंबर, 2023 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. 

NMMS Exam Result 

खाली दिलेल्या संकेतस्थळावर दिनांक 07 फेब्रुवारी 2024 रोजीपासून पाहता येणार आहे.

Correction in Student Information of NMMS Exam

सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

  • ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही. 
  • प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी परिषदेच्या www.mscepune.inhttps://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
  • सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने गुणपडताळणी केली जात नाही. आशा सूचना परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात आले आहेत.

  • शिष्यवृत्तीसाठीची निवड यादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.
  • सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित 40 % गुण मिळणे आवश्यक आहेत. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचीत जमाती (ST) व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दोन्ही विषयात एकत्रित 32% गुण मिळणे आवश्यक आहेत)

  • MAT विषयातील खाली नमूद केलेले 01 प्रश्न रद्द झालेले असल्याने MAT विषयास 88 प्रश्न व SAT विषयास 90 प्रश्न असे एकूण 178 पैकी गुणदान करण्यात आले आहे.
  • ज्या विद्यार्थ्यांचे प्रथम नाव / वडिलांचे नाव व आडनाव यामध्ये पूर्ण बदल होत असेल अशा विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात येत आहे.
NMMS Result Letter
NMMS Result Letter


Aims of NMMS Exam  

  • आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. 
  • प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. 
  • NMMS Scholarship इयत्ता 12 वी पर्यंत मिळते. 
  • शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु. 1000/- (वार्षिक रु. 12000/-) आहे.
  • इयत्ता 8वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उपन्न रु. 350000/- पेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते.

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने