Safai Kamgar Bharti 2024: मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद आस्थापनेवर "सफाई कामगार" पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून Safai Kamgar Bharti 2024 साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाचा नमूना आणि संपूर्ण जाहिरात खालीलप्रमाणे देण्यात आले आहेत.
Safai Kamgar Bharti 2024 |
Safai Kamgar Bharti 2024: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सफाई कामगार पदांची नवीन भरती जाहीर; चौथी पासवर सुवर्णसंधी
प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहीत नमुन्यात जाहिरातीसोबत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्ये आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या (Self Attested) छायांकित प्रतींसह दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी या कार्यालयात पोहोचेल अशा रीतीने फक्त स्पीड पोस्टामार्फत पुढील पत्त्यावर पाठवावेत.
"प्रबंधक (प्रशासन),
मुंबई उच्च न्यायालय,
खंडपीठ औरंगाबाद,
जालना रोड, छत्रपती संभाजीनगर - 431 009
- स्पीड पोस्टाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
Education Qualification for Safai Kamgar Bharti 2024
- शैक्षणिक पात्रता
- उमेदवार भारताचा नागरीक असावा.
- उमेदवार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा.
- उमेदवार जाहिरात प्रसिध्दीच्या तारखेला 18 वर्षापेक्षा लहान व 38 वर्षापेक्षामोठा नसावा.
- मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षाची असेल.
- न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही,
- तथापि, त्यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत अर्ज करणे आवश्यक आहे.
- उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहीता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे.
सफाई कामगारसाठी पात्र उमेदवारीकरिता अटी :-
- उमेदवार करार करणेस सक्षम असावा.
- उमेदवाराला नैतिक पतनाच्या गुन्हयासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे.
- उमेदवाराच्या विरूध्द फौजदारी खटला प्रलंबित नसावा.
- न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांचेवर कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नसावी.
Required Document for Safai Kamgar Bharti 2024
- (self attested) केलेल्या छायांकित प्रति सादर कराव्यात -
- शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (उदा. 4थी, 7वी, 10वी, 10वी इत्यादी).
- जन्मतारखेचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) अथवा तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जन्मतारखेचा पुरावा.
- उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला.
- जातीचा दाखला (मागासवर्गीयांसाठी).
- सफाई कामाचा पुर्वानुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र.
- महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत, जर उमेदवाराने नाव बदलले असल्यास नाव बदलाबाबतचे दस्तऐवज उदा. शासकीय राजपत्र किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी.
- सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास, नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.
- इतर विशेष अर्हता असल्यास त्याबाबतचा दाखला.
- न्यायालय प्रशासनाने विचारल्यास इतर कोणतेही दस्तऐवज.
उमेदवारांनी अर्जासोबत खालील मूळ दाखले / कागदपत्रे जोडावीत-
- लहान कुटुंबाबाबत प्रतिज्ञापन [जाहिरातीसोबत नमुना 'अ' प्रमाणे]
- जाहिरात प्रसिध्दीनंतरची तारीख असलेले, दोन प्रतिष्ठीत व्यक्तींनी दिलेले
- चारित्र्य संपन्नतेविषयीचे दोन प्रमाणपत्र (त्यांचा हुद्दा, पत्ता व संपर्क क्रमांक) [जाहिरातीसोबत परिशिष्ट 'ब' नमुन्यात]
- उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची (कार्यालयाची) ३ मंजुरी घेतल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.
- अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले पाच रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकीट पाठवावे.
- पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटो सोबत पाठवावा.
How to apply for Safai Kamgar Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत
उमेदवाराने संपूर्ण जाहिरात तपशीलवार वाचावी व अर्जात भरलेला तपशील योग्य आहे हे सुनिश्चित करुन घेऊन अर्ज सादर करावा.
उमेदवाराने एकापेक्षा अनेक अर्ज सादर केल्यास शेवटी सादर केलेला अर्ज विचारात घेतला जाईल
विवाहित महिला उमेदवारांनी किंवा कोणत्याही कारणास्तव नावात बदल केलेल्या उमेदवारांनी अर्जामध्ये शैक्षणिक पात्रता (उदा. 4थी, 7वी, 10वी, आणि 12वी इत्यादी) तत्सम अर्हता धारण करताना त्यांचे जे नाव होते त्याच नावाने अर्ज करणे अनिवार्य आहे.
सफाई कामगार पदासाठी इयत्ता चौथी मधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे. जर उमेदवार इयत्ता चौथी परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता उदा. 10 वी 12वी/पदवी प्राप्त असेल व त्याच्याकडे / तिच्याकडे इयत्ता चौथी चे गुणपत्रक नसेल तर त्याने तिने अर्ज भरताना इयत्ता चौथी करिता काल्पनिकरित्या 50% गुणांची (उदा. एकूण 100 पैकी 50गुण प्राप्त) नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता रकान्यात करावी.
राज्य शासनाच्या इतर विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी सध्याच्या नियोक्त्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. उच्च न्यायालय प्रशासनाकडून निर्देशित केल्यावर ते सादर करावे लागेल.
उमेदवारांनी त्यांचा वैध ई-मेल आय डी तसेच मोबाईल नंबर अर्जात नमूद करावा ज्यावर आवश्यकता भासल्यास पत्रव्यवहार तसेच संपर्क केला जाईल
उमेदवारांकरिता इतर आवश्यक सूचना :
- अर्ज पाठवताना पाकिटावर "सफाई कामगार या पदाकरिता अर्ज" असे ठळक अक्षरात लिहावे.
- अर्जातील विहित जागी उमेदवाराने स्वतःचे अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (फोटो) चिकटवावे.
- उमेदवाराने सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातच अर्ज सादर करावा, सदर अर्जातील माहिती स्पष्ट हस्ताक्षरात लिहावी, अर्ज अपूर्ण भरलेला असेल किंवा वाचता येण्याजोगा नसेल किंवा विहित नमुन्यात नसेल तर असा अर्ज नाकारण्यात येईल आणि त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही,
- अर्ज भरताना कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तथापि, अल्पसूची प्रसिध्द केल्यानंतर त्यात समाविष्ट असलेल्या उमेदवारांनीच (Shortlisted Candidates) तद्नंतर "Registrar High Court Bench at Aurangabad" यांचे नावे राष्ट्रीयकृत बँकेतून रूपये २००/- चा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) अथवा पोस्टल ऑर्डर काढावी लागेल. सदरील शुल्क ना-परतावा राहील.
- निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती खोटी सादर केल्याचे किंवा खरीमाहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. अथवा नियुक्ती झाल्यास त्याला/तिला पदावरून काढून टाकण्यात येईल.
- जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार व उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार तसेच शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा व कार्यालय परिसर स्वच्छतेचा असलेल्या अनुभवानुसार उमेदवारांची अल्पसूची (Shortlist) प्रसिध्द करण्यात येईल. अल्पसूची (Shortlisting) करण्याचे सर्वाधिकार मा. निवड समिती, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत.
- पात्र उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, तोंडी मुलाखत ही मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर ४३१ ००९, या ठिकाणी घेण्यात यईल.
- पात्र उमेदवारांनी प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, तोंडी मुलाखतीसाठी नियोजीत तारखांना स्वखर्चाने हजर रहावे लागेल.
- सदर पदाची प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांनी उपस्थित राहताना त्यांनी प्रवेशपत्र, तसेच, या कार्यालयास मान्य होईल असे स्वतःचे फोटो असलेला ओळखीचा पुरावा जसे की, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहनचालक परवाना यापैकी कोणताही एक मूळ पुरावा आणावा. प्रवेशपत्राच्या सादरीकरणाशिवाय उमेदवाराला उपरोक्त चाचणींसाठी प्रवेश मिळणार नाही,
- उमेदवारांची निवड ही सफाई कामगार पदाच्या प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी व तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे केली जाईल.
- प्रात्यक्षिक परीक्षा, आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती पडताळणीसाठी आणाव्यात. योग्य छाननीनंतर केवळ पात्र उमेदवारांनाच मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येईल,
- सफाई कामगार पदाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास उमेदवार उर्वरित चाचणीसाठी पात्र राहणार नाही.
- कोणत्याही बदलाबाबतची सूचना उशिरा मिळाल्याने नियोजित तारखेस व
- वेळेस उमेदवार सफाई कामगार पदाच्या प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी व तोंडी मुलाखतीस अनुपस्थित राहिल्यास उच्च न्यायालय प्रशासनाकडून याबाबत कोणतीही तक्रार/दावा ऐकला जाणार नाही तथा विचारात घेतला जाणार नाही.
- कार्यालयाच्या नियंत्रणाबाहेरील कोणत्याही अनपेक्षीत घटनेमुळे भरती प्रक्रियेचे वेळापत्रक बदलू शकते, तसा बदल वेळोवेळी उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द केला जाईल. त्याकरिता उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ https://bombayhighcourt.nic.in ल्ला वेळोवेळी भेट द्यावी.
चिराग मनोज पाटील
उत्तर द्याहटवा