ITI Student Stipend : 'आयटीआय' च्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता 'आयटीआय' च्या विद्यार्थ्यांना Monthly Stipend मिळणार आहे. दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात सर्वत्र छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी त्यांनी घोषणा केली. याचा लाभ राज्यातील 400 पेक्षा जास्त ITI मधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
![]() |
ITI Student Stipend |
ITI Student Stipend: 'आयटीआय'च्या विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतन; कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची मोठी घोषणा
इयत्ता दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या असून व्यवसायाच्या विविध संधींची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 06 मे रोजी स. 9:00 वा. कुर्ला येथील डॉन बॉस्को इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर येथे संपन्न झाले.
छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात Chatrapati Shahu Maharaj Yuvashakti Carrier Guidance शिबीर आयोजन करण्यात आले आहे. 6 मे ते 6 जून पर्यंत या अभिनव कार्यमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर कार्यक्रमात अतिशय चांगला पप्रतिसाद युवक युवतींनी दिलेला आहे. आजच्या या कार्यक्रमात 5000 पेक्षा जास्त युवक युवतीने सहभाग नोंदवून कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. Carrier Guidance Programme
10 वी 12वी च्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन
प्रदर्शन व स्टॉल ची उभारणी करण्यात आली आहे. यामागील उद्देश 10 वी 12वी परीक्षेनंतर निकालपर्यंत चा कालावधीमध्ये विद्यार्थी संभ्रमावस्थेत असतात. कुठे प्रवेश घ्यायचं? काय करायचं? नोकरी करावी की स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आशा एक ना अनेक प्रश्नांनी विद्यार्थ्यांच्या डोक्यात घर करून बसलेले असते. या संभ्रमावस्थेतुन बाहेर पडून भविष्यातील करिअरच्या विविध संधी विषयी मार्गदर्शन यातून केले जाते. Carrier Guidance
शंकाचे निरसनसाठी हेल्पलाईन Helpline For Student
या कार्यक्रमात एक HELPLINE जारी करण्यात येणार आहे. सोबतच एक ईमेल सुद्धा जारी करण्यात येणार आहे. या हेल्पलाईन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कार्यक्रमामध्ये किंवा कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न शंका निर्माण झाले तर ते या माध्यमातून विचारू शकतील. त्यांच्या त्या शंका किंवा प्रश्नावर हेल्पलाईन कॅब्या माध्यमातून शंकाचे निरसन करून माहिती देण्यात येणार आहे. Helpline For Student
ITI च्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन (ITI Student Stipend)
ITI च्या विद्यार्थ्यांना या वर्षांपासून प्रतिमाह प्रति विद्यार्थी 500 रुपये याप्रमाणे विद्यावेतन सुरू करण्यात येणार आहे अशी मोठी घोषणा कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केली. या Student Stipend Benefit लाभ राज्यातील 427 आयटीआय मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. राज्यातील 427 ITI चे नूतनीकरण करण्यात आले आहे. ITI करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत महाराष्ट्र शासनाने शिक्षणासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आणि ज्यांना रोजगार पाहिजे त्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मार्गदर्शन करू असे प्रयत्न शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.
दहावी, बारावीनंतर नेमके काय करावे याबाबत अनेक विद्यार्थी संभ्रमित असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी #कौशल्यविकास विभागामार्फत आयोजित छत्रपती #शाहूमहाराज युवाशक्ती करिअर शिबीर अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी यात आवर्जून सहभाग घ्यावा, अशी प्रतिक्रिया या विद्यार्थ्याने दिली. pic.twitter.com/HU0F4SdRZD
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 6, 2023
दहावी, बारावीनंतर नेमके काय करावे याबाबत अनेक विद्यार्थी संभ्रमित असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी कौशल्यविकास विभागामार्फत आयोजित छत्रपती शाहूमहाराज युवाशक्ती करिअर शिबीर अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी यात आवर्जून सहभाग घ्यावा.