मोठा निर्णय!! कोतवालांच्या मानधनात दुप्पट वाढ Kotwal Salary Increase GR

मागील अनेक वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या कोतवालांच्या बाबतीत मोठा शासन निर्णय पारित करण्यात आले आहे. या निर्णयानुसार तुटपुंज्या मानधनात आता दुप्पट वाढ करण्याबाबत शासन निर्णय देण्यात आला आहे.

मोठा निर्णय!! कोतवालांच्या मानधनात दुप्पट वाढ

कोतवालांची मागणी

राज्यातील कोतवालांनी विविध निवेदनाद्वारे कोतवाल हे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे 24 तास शासकीय कामास बांधील असून कोतवालाची कर्तव्य जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेले आहेत. 

Kotwal Salary Increase GR
Kotwal Salary Increase GR

कोतवालांची कर्तव्य जबाबदारी तसेच कामाच्या स्वरूपाचा विचार करता राज्यातील कोतवालांना मिळणारे मानधन हे तुटपुंजे स्वरूपाचे असल्याने राज्यातील कोतवालांनी मा. मुख्यमंत्री, मा उपमुख्यमंत्री मा मंत्री महोदय व मा लोकप्रतिनिधींना वारंवार भेटून कोतवालांना सरसकट एकसमान 15 हजार रुपये इतके मानधन देण्याची मागणी करीत होते.



त्या अनुषंगाने अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या प्रमाणे राज्यातील कोतवालांना मानधन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करण्यात आला. त्यानुसार राज्यातील कोतवालांच्या मानधनात वाढ करण्याची बाब लक्षात घेऊन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.



राज्यामध्ये एकूण 12,793 कोतवाल आहेत. या कोतवालांना मिळणाऱ्या 7500/- वरून 01 एप्रिल 2023 पासून दरमहा पंधरा हजार रुपये इतके मानधन वाढ लागू करण्यात येत असल्याबाबत हे शासन निर्णय घेण्यात आले आहे. कोतवालाना मिळणारी मानधन वाढ ही 01 एप्रिल 2023 पासून वाढ करण्यात येणार आहे.

हे वाचा महत्वाचे

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा   

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने