जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश मराठी माहिती | Navoday Vidhyalaya Admission Information In Marathi

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश मराठी माहिती  | Navoday Vidhyalaya Admission Information In Marathi प्रामुख्याने ग्रामीण भागातील हुशार मुलांना त्यांच्या कुटुंबाची सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता दर्जेदार आधुनिक शिक्षण देणे, सामाजिक मूल्ये, पर्यावरण जागरूकता, साहसी उपक्रम आणि शारीरिक शिक्षण यासारखे महत्त्वाचे घटक विकसित करण्याचे व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन Navodaya Vidyalaya Samiti कार्य करत आहे.

जवाहर नवोदय विद्यालयामध्ये (Jawahar Navodaya Vidyalaya) प्रवेश मिळविण्यासाठी दरवर्षी परीक्षा घेतली जाते. अनेक पालकांना आपल्या मुलांचा प्रवेश जवाहर नवोदय विद्यालय मध्ये व्हावा असे वाटतो. म्हणून याठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश विषयी मराठी माहिती देण्यात आली आहे.

  • जवाहर नवोदय विद्यालय (इयत्ता 6वी) प्रवेश परीक्षा 2023-24 साठी इथे क्लिक करा 
परंतु अनेकदा  ग्रामीण भागातील पालकांना Navoday Vidhyalaya Admission मराठीमध्ये माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक पालक आणि  विद्यार्थ्यांच्या हातून ही संधी हुकली जाते. परिणामी प्रवेश मिळत नाही.
जवहार नवोदय विद्यालय माहिती

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश माहिती | Navoday Vidhyalaya Admission Information In Marathi

जवाहर नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारा आयोजित निवड परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते.

  • सदर परीक्षा लेखी वस्तुनिष्ठ स्वरुपात CBSE कडून घेतली जाते. यामागील मुख्य उद्देश  म्हणजे ग्रामीण भागातील प्रतिभावान व हुशार विद्यार्थी कोणत्याही अडचणी शिवाय परीक्षेत सहभागी होऊ शकतील. Navoday Vidhyalaya Admission Information In Marathi
  • ही परीक्षा दरवर्षी ज्या जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय आहेत त्या जिल्ह्यात परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. 
  • महाराष्ट्र राज्यात 34 जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय आहेत.
  • जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश दरवर्षी सहावी, नववी आणि अकरावी  वर्गासाठी प्रवेश दिला जातो. 

Navoday Vidhyalaya Admission Information In Marathi

अटी व परीक्षा नियोजन 

Navoday Vidhyalaya Admission Information
इयत्ता सहावी वर्गात प्रवेशासाठी अटी व पात्रता निकष 

  • ज्या जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय आहेत त्याच जिल्ह्यातील विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करू शकतील. तथापि ज्या जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय आहे परंतु नंतरच्या काळामध्ये त्या जिल्ह्याचे विभाजन झाले असल्यास मूळ जिल्ह्याच्या हद्दीतील विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. 
  • विभाजनाची ही अट विभाजित करण्यात आलेल्या नवीन जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरु झाले नसेल.
  • जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवीमध्ये शासकीय / शासकीय अनुदानित अथवा अन्य मान्यता प्राप्त शाळा / विद्यालयात प्रवेशित  असणे अनिवार्य आहे किंवा समग्र शिक्षा योजने अंतर्गत चालू असलेल्या शाळा किंवा राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था (NIOS) मधील ब प्रमाणपत्र योजनेतील अभ्यासक्रमात किमान गुण (अध्ययन स्तर) प्राप्त करणे आवश्यक आहे.  
  • एखाद्या शाळा / विद्यालयास मान्यता प्राप्त शाळा म्हणून तेव्हाच समजले जाईल जेव्हा त्या शाळा / विद्यालयास शासन किंवा शासनमान्य अधिकृत संस्थेद्वारा मान्यता देण्यात आली असेल. 
  • समग्र शिक्षा अंतर्गत चालणाऱ्या शाळा / विद्यालयास शासन किंवा शासनमान्य अधिकृत संस्थेद्वारा मान्यता असणे अनिवार्य आहे. अशी एखादी शाळा जिथे विद्यार्थ्याने राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था अंतर्गत प्रमाणपत्र ब प्राप्त केला असेल ती  शाळा किंवा विद्यालय राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था द्वारा प्रामाणित असली पाहिजे. 
  • विद्यार्थी हा प्रवेश  पूर्व इयत्ता पाचवीची परीक्षा उतीर्ण केलेला असावा. कारण त्यास केवळ वरील अटींवर इयत्ता सहावीमध्ये प्रवेश दिला जातो.
  • जो विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छीत आहे त्याचे वय 9 ते 13 वर्षामधील असणे आवश्यक आहे. ही वयाची अट प्रत्येक संवर्गासाठी लागू आहे. ज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचाही समावेश होतो.
  • एखादा विद्यार्थी ज्याने एक दिवस ही शहरी भागातील असणाऱ्या शाळेत इयत्ता तिसरी चौथी किंवा पाचवी इयत्तेत शिकला असेल तो विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थी गणला जाईल. "जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश मराठी माहिती  | Navoday Vidhyalaya Admission Information In Marathi"

  • शहरी क्षेत्र याचा अर्थ कि जो 2011 च्या जणगणने नुसार किंवा त्यानंतर शासनाने शहरी क्षेत्र म्हणून सूचित केलेले  आहेत. त्या शिवाय इतर सर्व क्षेत्र ग्रामीण क्षेत्र म्हणून ओळखले जातील.

  • ग्रामीण कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने मागील तीन वर्षामध्ये सलग तीन सत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था / शासकीय अनुदान प्राप्त / मान्यता प्राप्त शाळेमधून इयत्ता तिसरी चौथी किंवा पाचवी ची परीक्षा उतीर्ण झाला असावा. आणि प्रती वर्ष एक पूर्ण शैक्षणिक सत्र ग्रामीण भागात पूर्ण केलेला असावा.
  • ते विद्यार्थी आवेदन करण्यास पात्र नाहीत ज्यांना 30 सप्टेंबर च्या पूर्वी पुढील वर्गात प्रमोट केला  गेला नसेल आणि इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश दिला नसेल.
  • कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणी परीक्षेत बसण्यास दुसऱ्यांदा प्रात्र होणार नाही. एकदाच परीक्षेस बसू शकेल.
ग्रामीण, अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीतील  मुली / दिव्यांगासाठी आरक्षण
  • प्रत्येक जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी उपलब्ध असणाऱ्या जागेपैकी 75 टक्के जागा ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असतात तर उर्वरित जागा ह्या शहरी भागातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असतात.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यासाठी जागेचे आरक्षण  "Javahar Navoday Vidhyalaya Admission" हे त्या जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षित ठेवले जातात. परंतु  कोणत्याही लोकसंखेमध्ये राष्ट्रीय प्रमाणापेक्षा (15 टक्के अनुसूचित जाती आणि 7.5 टक्के अनुसूचित जमाती) कमी अथवा 50 टक्केपेक्षा अधिक असू नये. हे आरक्षण अंतर परिवर्तनीय आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी निवडले गेलेल्या विद्यार्थ्यासाठी अतिरीक्तपणे लागू केले जाते.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांच्या आरक्षणाव्यतिरिक्त 27 टक्के आरक्षण इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी दिले जाते. इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण केंद्रीय सूची वेळोवेळी जाहीर केलेय नुसार लागू केले जाते. ज्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्रीय सूचीमध्ये समावेशित केले गेले नाही ते विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून आवेदन करू शकतील.
  • एकूण जागेच्या एक तृतीयाश जागा मुलीमधून भरल्या जातात.
  • दिव्यांग विद्यार्थ्यासाठी (अस्थीव्यंग, कर्णबधीर,  दृष्टीबाधित अंध) केंद्र शासनाच्या नियमानुसार आरक्षणाची तरतूद आहे.
  • दृष्टीबाधित अंध विद्यार्थ्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका अट पूर्ण होत असेल तरच मान्य होईल.
  • पूर्णतः अंध असावा किवा दृष्टी तीव्रता 6/60 किंवा  20/200 पेक्षा अधिक असू नये किंवा दृष्टी क्षेत्राचा कोन 20 अंश किंवा त्यापेक्षा कमीअसावे.
  • कर्णबधिरत्व  किंवा श्रवण दिव्यांगता ज्या विद्यार्थ्याचा श्रवणऱ्हास 60 dB पेक्षा अधिक असावा
  • हलनचलन दिव्यांगता  अस्थी,सांध्यामधील व स्नायुमधील दोषामुळे हात पाय च्या संचालन / हालचाल करताना कायमस्वरूपी अडथळा येत असेल अथवा हालचालीवर नियंत्रण राहत नसेल,
  • दिव्यांग व्यक्तीचा थोडक्यात असा अर्थ आहे कि शरीरातील कोणत्याही प्रकारची दिव्यांगता किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असेल आणि शल्य चीक्त्साकाक्डून प्रमाणित केलेलं प्रमाणपत्र असेल.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश मराठी माहिती

परीक्षा व माध्यम 

  • जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVTE) ही वेगवेगळ्या 20 अधीसुचीत केलेल्या भाषेपैकी कोणत्याही एक भाषा निवडता येईल. अधिसूचित करण्यात आलेल्या भाषा आसामी, बंगाली, बोडो, इंग्रजी, गारो, गुजराती, हिंदी, कन्नड, खासी, मल्याळम, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, मणिपुरी, मणिपुरी (बांगला लिपी), तामिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश होतो.
  • इयत्ता सहावीसाठी विषयनिहाय वेळ व गुण 
  • बुद्धिमत्ता या विषयासाठी 60 मिनिटे वेळ असून एकूण गुणांपैकी 50 टक्के  गुण यासाठी दिले जातात तर अंकगणित आणि भाषा विषयासाठी 60 मिनिटे वेळ आणि उर्वरित  50 टक्के गुण समान विभागून दिले जाते. 

इयत्ता नववीसाठी प्रवेश व पात्रता 

Navoday Vidhyalaya Admission Information


जवाहर नवोदय विद्यालयामध्ये उपलब्ध सुविधांच्या उत्तम वापरासाठी व उपयोगीतेसाठी इयत्ता नववीच्या वर्गामध्ये रिक्त जागेसाठी पार्श्व  प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिला जातो. 

  • इयत्ता नववीसाठी पात्रता अटी

जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता नववीच्या वर्गामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना खालील अटी व शर्थींची पूर्तता करावी लागते. 

केवळ तेच विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववीत प्रवेश घेऊ शकतात कि ज्या विद्यार्थ्यांनी त्याच जिल्ह्यातील शासकीय / शासनाद्वारे मान्यता प्राप्त शाळेतून इयत्ता आठवी  उतीर्ण झाले असेल. 

इयत्ता नववीमध्ये प्रवेश घेऊ इच्छीनाऱ्या  विद्यार्थ्यांचे वय त्या वर्षीच्या मी महिन्यातील एक तारखेला 13 ते 16 वर्षाच्या आत असावे. वयाची हि अट अनुसूचित जाती व अनुसूचित जमतीच्या प्रवर्गात मोडणाऱ्या विद्यार्थ्यासाठीही लागू राहील.

इयत्ता नववीसाठी होणाऱ्या निवड चाचणी परीक्षा ही इंग्रजी किंवा हिंदी या दोन माध्यमातून होत असते.

  • इयत्ता नववीसाठी परीक्षा पद्धती

इयत्ता नववीच्या प्रवेश परीक्षेसाठी इयत्ता आठवीच्या वर्गस्तरावर  खालील विषयावर आधारित प्रश्न विचारले जातात. सदर परीक्षा ही वस्तुनिष्ठ व वर्णनात्मक लेखी स्वरुपात घेतली जाते. परीक्षेचा कालावधी कोणतेही मध्यंतर न देता तीन तासाची नियोजित असते. तसेच रिक्त जागेचे आरक्षण हे त्या रिक्त झालेल्या संवर्गातील विद्यार्थ्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले असते. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश मराठी माहिती  | Navoday Vidhyalaya Admission Information In Marathi

  • इयत्ता नववीसाठी विषय वेळ व गुण 

इंग्रजी व हिंदी या विषयासाठी एकूण गुणांपैकी 30 गुण यासाठी दिले जातात तर गणित आणि विज्ञान विषयासाठी उर्वरित 70 गुण समान विभागून दिले जाते. ही परीक्षा 100 गुणाची होत असून त्यास एकूण तीन तास वेळ दिला जातो.इयत्ता नववीसाठी प्रवेश परीक्षा ही संबंधित जिल्ह्यातील जवाहर नवोदय वियालय  ही परीक्षा केंद्र म्हणून घोषित करण्यात आलीआहे.

  • इयत्ता 11वीसाठी प्रवेश व परीक्षेचे आयोजन
Navoday Vidhyalaya Admission Information

इयत्ता अकरावीसाठी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये उपलब्ध रिक्त जागेचा अहवाल स्थानिक वर्तमानपत्रातून अधिसूचित केले जाते. त्यानुसार प्रवेश निश्चित केले जाते. दरवर्षी इयत्ता 11 वी प्रवेश हे 15 जुलै पर्यंत पूर्ण केले जाते.

  • इयत्ता 11वी प्रवेशासाठी पात्रता अट 

 इयत्ता 11वी प्रवेशासाठी  पात्र विद्यार्थ्यांचे वय 01 जुलै योजी 14 -18 वर्ष असणे अनिवार्य आहे.

इयत्ता 11 वी साठी प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्याने त्याच्या मूळ जिल्ह्यात कोणत्याही  शासन मान्यताप्राप्त शाळा / विद्यालय (जो की केन्द्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अथवा अन्य शिक्षण मंडळ) मधून इयत्ता 10वी उतीर्ण झाला असावा.

आवेदन प्राप्त झालेल्या विद्यार्थ्याची इयत्ता दहावीच्या प्राप्त गुणाची गुणवत्ता यादी लावली जाते. त्यानुसार त्या जिल्ह्यात उपलब्ध जागा आणि गुणानुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

 इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी हिंदी व इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक असते...

धन्यवाद मित्रानो, ही माहिती आपणास नक्की आवडेल अशी आशा करतो. आपल्याला आवडल्यास जास्तीत जास्त पालकांपर्यंत  नक्की शेअर करावी. 

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा  


Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने